Betwa River Bridge Collapses : उत्तर प्रदेशात बेतवा नदीवरील बांधकामाधीन पुलाचा स्लॅब कोसळून सहा मजुरांचा मृत्यू;अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

- बचाव कार्यासाठी एसडीआरएफ पथक तैनात; जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी


लखनऊ : उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात बेतवा नदीवर बांधण्यात येत असलेल्या नव्या पुलाचा स्लॅब आणि शटरिंग शुक्रवारी पहाटे जोरदार वादळ आणि सोसाट्याचा वाऱ्यामुळे कोसळला. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली दबून सहा मजुरांचा मृत्यू झाला असून, आणखी काही जण मलब्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलिस आणि प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, मदत आणि बचाव कार्यासाठी एसडीआरएफ पथकाला पाचारण करण्यात आले आहे. (Betwa River Bridge Collapses)


मिळालेल्या माहितीनुसार, जिल्यातील ललपुरा परिसरातील परसनी आणि कंडौर गावांदरम्यान बेतवा नदीवर गेल्या तीन वर्षांपासून नव्या पुलाचे बांधकाम सुरू आहे. शुक्रवारी पहाटे सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास सर्व मजूर पुलाखाली झोपलेले असताना जोरदार वादळ आणि पावसादरम्यान पुलाची स्लॅब व शटरिंग अचानक कोसळली. दुर्घटनेनंतर अनेक मजूर ढिगाऱ्याखाली अडकले. (Betwa River Bridge Collapses)



घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि सेतू निगमचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. बचाव कार्यासाठी एसडीआरएफला तैनात करण्यात आले आहे. आतापर्यंत मलब्यातून चिल्ला बांदा येथील लोकेन्द्र (२४) पुत्र राधेश्याम निषाद, कुलदीप (२१) पुत्र प्रेमचंद्र निषाद, भूरागढ बांदा येथील सावंत (३०), स्वासा ललपुरा हमीरपूर येथील सभाजीत (३०), पुष्पेन्द्र सिंह (३५) आणि अछपुरा ललपुरा येथील राजेश पाल (४१) यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. (Betwa River Bridge Collapses)


मजुरांनी राजेश, कल्लू आणि अवधेश यांच्यासह इतर काही मजूरही ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता व्यक्त केली आहे. बचाव पथकाने पुलाच्या खांबात अडकलेल्या तीन मजुरांना सुरक्षित बाहेर काढले आहे. (Betwa River Bridge Collapses)


ललपुरा पोलीस ठाण्याचे प्रभारी राकेश सरोज यांनी सांगितले की, दुर्घटनेनंतर मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. सापडलेले मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. (Betwa River Bridge Collapses)



दरम्यान, हमीरपूर सदर विधानसभा क्षेत्रात राठ-हमीरपूर राज्य महामार्गाला परसनी, कंडौरमार्गे कुरारा फोरलेन महामार्गाशी जोडण्यासाठी ललपुरा पोलीस ठाणे क्षेत्रातील परसनी आणि कंडौर गावांदरम्यान बेतवा नदीवर हा नवा पूल बांधला जात आहे. या पुलासाठी ७९१२,२४ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. या पुलासाठी स्थानिक राज्यसभा खासदार बाबूराम निषाद यांनी मोठा पुढाकार घेतला होता. हा पूल पूर्ण झाल्यानंतर कुरारा ते मिर्झापूर-झाशी महामार्गाशी परसनीकडे जाणारे अंतर मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. (Betwa River Bridge Collapses)



२६ गावांतील दीड लाख ग्रामस्थांना मोठा दिलासा :


राज्यसभा खासदार बाबूराम निषाद यांनी सांगितले की, बेतवा नदीवर नवा पूल उभारल्यामुळे परसनी गावासह मौराकांदर, बहरौली डांडा, कलौलीजार, उजनेडी, अछपुरा वहदीना, स्वासा बुजुर्ग, स्वासा खुर्द, कुम्हऊपुर, कुआं डेरा, कंडौर, बैजेमऊ इस्लामपुर, हरेहटा, पतारा, जखेला, नैठी, रिठारी, छानी खुर्द, छानी बुजुर्ग, देवीगंज आदी २६ गावे वेगाने विकसित होतील. त्यांनी सांगितले की, हे ग्रामीण भाग अद्याप विकासाच्या बाबतीत खूप मागासलेले आहेत. शासनाने पुलाच्या बांधकामाला हिरवा कंदील दिला होता.

Comments
Add Comment

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

IST Mandatory 2027 : मार्च २०२७ पासून देशभरात इंडियन स्टँडर्ड टाइम बंधनकारक

नवी दिल्ली : देशातील सर्व संस्था, कंपन्या आणि संबंधित आस्थापनांना मार्च २०२७पासून कायदेशीर, व्यावसायिक, डिजिटल

Manjit Kaur : लिव्ह-इन पार्टनरच्या अत्याचारानंतर ५४ दिवस मृत्यूशी झुंज; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौरचा मृत्यू

मनजीत कौरचा लिव्ह-इन पार्टनर आणि त्याच्या एका साथीदाराच्या क्रूरतेनंतर ५४ दिवस रुग्णालयात जिद्दीने जगण्यासाठी