Nashik : नाशिकच्या 'या' ठिकाणचे एनर्जी ड्रींक, मैदा, पापड, पनीरसाठा जप्त, तुकाराम मुंढेकडून नाशिकमध्येही दणका

Nashik : गेल्या काही दिवसांत अन्न व औषध प्रशासन विभाग अ‍ॅक्शन मोडवर असल्याचे दिसून येत आहे. याचे कारण म्हणजे तुकाराम मुंढे. कर्तव्यदक्ष आणि कर्तव्यकठोर अधिकारी म्हणून ओळख असलेल्या तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाचा पदभार स्वीकारला आहे. अन्न व औषध प्रशासनाचे नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारताच राज्यभरात नियमभंग करणाऱ्या अन्न व औषध विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. राज्यभरात मोठ्या प्रमाणात अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कारवाई सुरु आहे. त्याचा प्रत्यय राज्यातील इतर जिल्ह्यांप्रमाणे नाशिक जिल्ह्यातही आला आहे.



अन्न व औषध प्रशासन विभाग नाशिकमध्येही अ‍ॅक्शन मोडवर


२७ मे रोजी नाशिक जिल्ह्यात विविध ठिकाणी तपासणी करण्यात आली होती. तपासणीत आढळलेल्या संशयास्पद अन्न पदार्थांचा १ लाख १९ हजार ७१२ रुपयांचा साठा जप्त करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त दि. ज्ञा. तांबोळी यांनी दिली आहे.


पंचवटी, मार्केट यार्ड या ठिकाणी मे. नेहा फुड प्रॉडक्टस् या पेढीच्या तपासणीतही विनापरवाना विक्री होत असल्याचे निदर्शनास आले. पेढीत विक्रीसाठी मैदा पापड आणि स्नॅक्स या दोन अन्न पदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेवून उर्वरित १३ हजार ५६८ रुपयांचा ३३६ किलोग्रॅम साठा भेसळीच्या संशयावरून अन्न व औषध प्रशासनामार्फत जप्त करून सुरक्षित ठेवण्यात आला आहे.


जेलरोड, नाशिकरोड येथील मे. अंजनी ट्रेडर्स या पेढीची तपासणी केली असता पेढी विनापरवाना व्यवसाय करीत असल्याचे आढळून आले. या पेढीत विक्रीसाठी आढळलेले Caffeinated Beverage (Sting) आणि एनर्जी ड्रिंक या दोन अन्न पदार्थांचे नमुने घेवून उर्वरित ३१ हजार ६८० रुपयांच्या १ हजार ५८४ बाटल्या भेसळीच्या संशयावरून अन्न व औषध प्रशासनामार्फत जप्त करून सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.



मे.बालाजी ट्रेडिंग कंपनी, त्र्यंबकेश्वर, नाशिक या पेढीच्या तपासणीत या पेढीत विक्रीसाठी असेलेले रिफाइंड सोयाबीन ऑइल हे खुल्‍या स्वरूपात विक्री होत असल्याचे आढळले, या तेलाचे नमुने तपासणीसाठी घेवून ६८ हजार ८६४ रुपयांचा ४३० किलोग्रॅमचा साठा जप्त करून सुरक्षित ठेवण्यात आला आहे.


मे.स्वामी बेव्हरेजस, माळेगाव, सिन्नर या पेढीत विक्रीसाठी आढळलेले स्वीटेन्ड कॉरबॉन्टेड बिव्हरेजेस या अन्न पदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेवून २ हजार ४०० रुपयांच्या बाटल्या भेसळीच्या संशयावरून अन्न व औषध प्रशासनामार्फत जप्त करून सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.


इगतपुरी तालुक्यातील मुंडेगाव येथे मे. गुरूदत्त छाया डेअरी या पेढीच्या तपासणीत पेढीत अनारोग्य परिस्थितीत पनीर या अन्न पदार्थाचे उत्पादन व विक्री होत असल्याचे निदर्शनास आले अन्न पदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेवून उर्वरित ३ हजार २०० रुपयांचा १० किलोग्रॅम साठा भेसळीच्या संशयावरून अन्न व औषध प्रशासनामार्फत जप्त करून नष्ट करण्यात आला.


२७ मे रोजी नाशिक जिल्ह्यात केलेल्या तपासणीत घेण्यात आलेले अन्न नमुने विश्लेषणासाठी संबंधित अन्न विश्लेषक यांच्याकडे पाठविण्यात आले असून विश्लेषण अहवाल प्रलंबित आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर अन्न व सुरक्षा मानके कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासन, सह आयुक्त तांबोळी यांनी कळविले आहे.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा