India - Britain : चीननंतर ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्री इव्हेट कूपर भारत दौऱ्यावर; जयशंकरांसोबत जागतिक सुरक्षेवर चर्चा

नवी दिल्ली : ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्री इव्हेट कूपर चीन दौऱ्यानंतर भारताच्या भेटीवर येणार आहेत. या दौऱ्यात त्या भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यासह व्यापार, शिक्षण आणि सरकारी क्षेत्रातील प्रतिनिधींची भेट घेणार आहेत. जागतिक आव्हानांना सामोरे जाणे आणि परस्पर सहकार्य अधिक मजबूत करणे, हा त्यांच्या या दोन देशांच्या दौऱ्याचा मुख्य उद्देश असणार आहे.


ब्रिटनच्या परराष्ट्र, राष्ट्रकुल आणि विकास कार्यालयाने (एफसीडीओ) दिलेल्या माहितीनुसार, चीन आणि भारत या दोन महत्त्वाच्या देशांसोबत होणाऱ्या मंत्रिस्तरीय बैठकींमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीतील परिस्थिती, युक्रेनवरील रशियाचे आक्रमण आणि आफ्रिकेतील इबोला साथीचा उद्रेक यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.



कूपर गुरुवारी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करतील. यानंतर त्या व्यापार आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित प्रतिनिधींशीही संवाद साधतील. एफसीडीओने सांगितले की, कूपर आपल्या भारतीय समकक्ष एस. जयशंकर यांची भेट घेतील. तसेच त्या उद्योजक, शिक्षणतज्ज्ञ आणि सरकारी


दिल्लीतील हा दौरा भागीदारांशी चर्चा करतील, जे ‘ब्रिटन-भारत व्हिजन २०३५’ पुढे नेण्यासाठी कार्यरत आहेत.अशा वेळी होत आहे, जेव्हा जवळपास एक वर्षापूर्वी भारत आणि ब्रिटन यांच्यात मुक्त व्यापार कराराला (एफटीए) अंतिम स्वरूप देण्यात आले होते. हा करार गेल्या वर्षी जुलैमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण झाला होता. त्यावेळी दोन्ही नेत्यांनी ‘ब्रिटन-भारत व्हिजन २०३५’लाही मंजुरी दिली होती.



हा एक महत्त्वाकांक्षी आणि भविष्याभिमुख करार मानला जातो. वेगाने बदलणाऱ्या जागतिक परिस्थितीत परस्पर विकास, समृद्धी आणि सुरक्षित व स्थिर जगाच्या निर्मितीसाठी एकत्रितपणे काम करण्याच्या दोन्ही देशांच्या वचनबद्धतेचे तो प्रतीक आहे.


भारत-ब्रिटन व्यापक आर्थिक आणि व्यापार करार (सीईटीीए) संदर्भातील मंजुरी प्रक्रिया ब्रिटनच्या संसदेत पुढे सरकली आहे. मात्र, ब्रिटनने प्रस्तावित केलेल्या नव्या पोलाद आयात निर्बंधांमुळे एफटीएसमोर काही आव्हाने निर्माण झाली आहेत.



या आठवड्यात प्रसिद्ध झालेल्या ‘इंडिया मीट्स ब्रिटन ट्रॅकर-२०२६’ अहवालानुसार, २०२५ मध्ये भारत आणि ब्रिटनमधील द्विपक्षीय व्यापार ४७.४ अब्ज पाउंडांपर्यंत पोहोचला असून, तो मागील वर्षाच्या तुलनेत ११.७ टक्क्यांनी वाढला आहे. सीईटीीए पुढील काही आठवड्यांत लागू झाल्यानंतर व्यापारात आणखी वाढ होण्याची अपेक्षा अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.


बीजिंगमध्ये इव्हेट कूपर चीनचे उपराष्ट्रपती हान झेंग आणि परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी चर्चा करतील. त्यानंतर त्या बुधवारी शेनझेन येथे जातील, जिथे त्यांचा दौरा विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रावर केंद्रित असेल. त्यानंतर त्या भारतासाठी रवाना होतील. पश्चिम आशिया आणि युरोपमध्ये सुरू असलेल्या संघर्षांच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दक्षिण आशियाई दौरा होत आहे. या संघर्षांमुळे जागतिक स्तरावर अस्थिरता वाढली असून त्याचा परिणाम जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांच्या विकासाच्या शक्यतांवरही होत आहे.

Comments
Add Comment

Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ

Tata Javelin Missile : भारतात टाटा बनवणार टँकविरोधी मिसाईल सिस्टीम जॅव्हलिन; अमेरिकन कंपनीसोबत करार

नवी दिल्ली : भारताने अमेरिकेकडून टँकविरोधी मिसाईल सिस्टीम एफजीएम-148 जॅव्हलिन खरेदी करण्याचा करार केला आहे.

Kiren Rijiju : न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानावर किरेन रिजिजू संतप्त

नवी दिल्ली : न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा