Khan Sir Coaching Classes Fire : खान सरांच्या कोचिंग सेंटरवर हल्ला; 'माझ्या यशामुळेच काही जणांना त्रास', प्रतिस्पर्धी संस्थांवर खान सरांचे गंभीर आरोप

पाटणा : बिहारमधील प्रसिद्ध शिक्षक आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून ओळखले जाणारे खान सर यांच्या कोचिंग सेंटरवर मंगळवारी रात्री झालेल्या हल्ल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेत कोचिंग सेंटरमध्ये घुसलेल्या काही अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केल्याचा आरोप असून, अंदाधुंद गोळीबार झाल्याचीही चर्चा आहे. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. (Khan Sir Coaching Classes Fire)


हल्ल्यानंतर प्रतिक्रिया देताना खान सर यांनी या प्रकारामागे शेजारच्या काही कोचिंग संस्थांचा हात असल्याचा गंभीर आरोप केला. "काही लोकांना माझ्याशी अडचण आहे. आमची फी कमी असून विद्यार्थ्यांना चांगले निकाल मिळतात, त्यामुळे काही प्रतिस्पर्धी संस्थांना ते खटकत आहे," असे ते म्हणाले. तसेच दोन दिवसांत कोचिंग संस्था उडवून देण्याच्या धमक्या मिळाल्याचाही दावा त्यांनी केला. (Khan Sir Coaching Classes Fire)



मात्र, या हल्ल्यामागे खान सर आणि इतर कोचिंग संस्थांच्या व्यवस्थापनामधील जुने वाद कारणीभूत असल्याचीही चर्चा सुरू आहे. पोलिसांकडून या सर्व बाबींचा तपास केला जात आहे. (Khan Sir Coaching Classes Fire)


दरम्यान, कोचिंग सेंटरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ अनेक विद्यार्थी रस्त्यावर उतरले. कोचिंग सेंटरबाहेर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाली होती. सुरक्षेच्या कारणास्तव खान सर यांची कोचिंग संस्था बुधवारी बंद ठेवण्यात आली असून पुढील काही दिवसही वर्ग बंद राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Khan Sir Coaching Classes Fire)


मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री सुमारे १०.५५ वाजण्याच्या सुमारास १० ते १२ जणांचा एक गट मुसल्लापूर हाट परिसरातील कोचिंग सेंटरमध्ये घुसला. त्यांनी कार्यालयात तोडफोड केली, बॅनर आणि पोस्टर्स फाडले तसेच विटा-दगडफेक केली. या गोंधळात कोचिंग संस्थेतील एक सुरक्षा रक्षक जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. (Khan Sir Coaching Classes Fire)



हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. रात्री सुमारे ११.१५ वाजता पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि तपासाला सुरुवात केली. त्यानंतर काही वेळातच खान सर देखील कोचिंग सेंटरमध्ये पोहोचले. (Khan Sir Coaching Classes Fire)


घटनेनंतर कोचिंग सेंटरच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांकडून आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (Khan Sir Coaching Classes Fire)


या प्रकरणाबाबत माहिती देताना एसपी दीक्षा कुमारी यांनी सांगितले की, पोस्टर लावण्याच्या वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. "सुमारे १० ते १२ जण घटनास्थळी आले होते. गोळीबार झाला की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. एक व्यक्ती जखमी झाली असून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे," असे त्यांनी सांगितले. गोळीबाराच्या दाव्यामुळे आणि कोचिंग संस्थांमधील कथित स्पर्धेमुळे या प्रकरणाने राज्यभरात मोठे लक्ष वेधून घेतले असून तपासाच्या निष्कर्षांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Khan Sir Coaching Classes Fire)





Comments
Add Comment

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि