दिल्लीतील हॉटेलमध्ये भीषण आग; अनेक जणांचा दुर्दैवी मृत्यू

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील मालवीय नगर परिसरात बुधवारी सकाळी एका हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये भीषण आग (Massive Fire) लागल्याची घटना घडली. या दुर्घटनेत १०  जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या भीषण घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली.


समोर आलेल्या माहितीनुसार, हौज रानी परिसरातील एका हॉटेल इमारतीत सकाळच्या सुमारास अचानक आग लागली. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले आणि धुराचे मोठे लोट संपूर्ण इमारतीत पसरले. त्यामुळे आत अडकलेल्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. आपला जीव वाचवण्यासाठी काही जणांनी खिडक्या आणि बाल्कनीकडे धाव घेतली, तर काहींनी इमारतीबाहेर पडण्याचा प्रयत्न केला.या दुर्घटनेत मृतांचा आखडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या अनेक गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशामक जवानांनी बचावकार्य सुरू करून इमारतीत अडकलेल्या अनेकांना सुरक्षित बाहेर काढले. दीर्घ प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.





आता पर्यत मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर अनेक जण जखमी झाले आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. या दुर्घटनेत मृतांचा आखडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


प्राथमिक माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस आणि अग्निशामक विभागाकडून घटनेचा सविस्तर तपास सुरू आहे.


या घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती. दुर्घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रशासनाकडून बचाव आणि मदतकार्य सुरू असून संबंधित यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.



Comments
Add Comment

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि

Dr. Koyyala Ruth John Paul: संघर्षातून यशाकडे! भारतातील तृतीयपंथीयांचा वैद्यकीय क्षेत्रात नवा इतिहास

मुंबई: तृतीयपंथातील अनेक व्यक्तींना आजही सामाजिक भेदभाव, शिक्षणातील अडचणी, रोजगाराच्या मर्यादित संधी आणि