Nashik : त्र्यंबकेश्वर मंदिराचा कारभार प्रथमच धर्मदाय आयुक्तांच्या अधिपत्याखाली येणार

Nashik News : शासनाच्या नवीन धोरणानुसार, त्र्यंबकेश्वर देवस्थानचा (Nashik Trimbakeshwar Temple) कारभार प्रथमच थेट धर्मदाय आयुक्तांच्या अधिपत्याखाली येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. यापूर्वी देवस्थानचे विश्वस्त धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडून नेमले जात असले, तरी मंदिराचे अध्यक्ष म्हणून जिल्हा न्यायाधीश, तर सचिव म्हणून नगरपालिकेचे मुख्याधिकारी कार्यभार पाहत असत. हे शासकीय अधिकारी अन्य विश्वस्तांना सोबत घेऊन देवस्थानचा कारभार चालवत होते.



मुख्य सूत्रे धर्मदाय आयुक्तांकडे जाणार


त्र्यंबकेश्वर देवस्थानचा कारभार सर्वप्रथम १९९४ मध्ये न्यायाधीशांकडे (Judge) सोपवण्यात आला होता. त्यानंतर २०१३ मध्ये न्यायालयाच्या सूचनेनुसार, अध्यक्ष आणि सचिवांसह एकूण नऊ व्यक्ती विश्वस्त म्हणून मंदिराचा कारभार पाहत आहेत. मात्र, न्यायाधीशांना न्यायालयाचे नियमित काम सांभाळून देवस्थानकडे लक्ष द्यावे लागत असल्याने अनेक अडचणी येत होत्या. आता मुख्य सूत्रे थेट धर्मदाय आयुक्तांकडे जाणार असल्याने, मंदिराच्या विविध प्रलंबित कामांविषयीची निर्णय प्रक्रिया अधिक वेगवान होईल आणि पर्यायाने विकासकामांना चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (Nashik Trimbakeshwar Temple)


दरम्यान, शासनाच्या या संभाव्य निर्णयावर त्र्यंबकेश्वरमधील नागरिकांमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. त्र्यंबकेश्वर देवस्थानसाठी पूर्णवेळ उपधर्मदाय आयुक्त (डेप्युटी चॅरिटी कमिशनर) नियुक्त केल्यास ते मंदिराच्या कारभारावर अधिक प्रभावीपणे लक्ष ठेवू शकतील, असा एक सूर आहे. तर दुसरीकडे, त्र्यंबकेश्वर मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र 'मंदिर प्राधिकरण' स्थापन करण्यात यावे, अशी मागणीही यापूर्वी सातत्याने झालेली आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : 'मोदी एक्सप्रेस'च्या तारखेत बदल

- कोकणवासीयांच्या मागणीनुसार गणपती स्पेशल ट्रेन आता ११ व १३ सप्टेंबरला धावणार; मंत्री नितेश राणे यांची

Mumbai News : मुंबईतील जगजीवन राम रुग्णालयाच्या रक्तपेढीचा परवाना दोन दिवसांसाठी निलंबित

मुंबई : रक्तदानाच्या नोंदींमधील त्रुटी, अपुरे दस्तऐवजीकरण आणि विहित क

Nitesh Rane : सिंधुदुर्गात कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी प्रभावी कार्यवाहीचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांची माहिती

कुक्कुटपालनाला 'कृषी समकक्ष' दर्जा दिल्याने युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात

Shri Ganesha Aarogyacha : श्रीगणेशोत्सवात मुंबईतील सार्वजनिक श्रीगणेश मंडळांच्या सभा मंडपात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रम राबविणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : यंदाच्या श्रीगणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी

Nitesh Rane : मालेगावमध्ये आधुनिक मासळी बाजार उभारणीला गती

- सांगलीतील प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : वाशिम जिल्ह्यातील

Sugar hoarding : साखरेच्या साठेबाजीला आळा; केंद्र सरकारकडून स्टॉक लिमिट २ हजार क्विंटलवर

नवी दिल्ली : केंद्र सरकारने साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी आणि सणांपूर्वी किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी साखर