Jodhpur female influencer: ट्रोलिंगचा त्रास असह्य झाला; जोधपूरमधील महिला इन्फ्लुएन्सरने उचलले टोकाचे पाऊल

जोधपूर : जोधपूरमध्ये सोशल मीडियावरील ट्रोलिंगला कंटाळून एका महिला कंटेंट क्रिएटरने (Content Creator) आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर संबंधित महिलेला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले  आहे. सद्या तिच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे.  (Jodhpur female influencer)

मिळालेल्या माहितीनुसार, जोधपूरमधील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अनिता बिश्नोई असं आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे नाव आहे. तिनं बुधवारी सकाळी आपल्या राहत्या घरी विष प्राशन केल्याचे सांगितले जात आहे. प्रकृती बिघडल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने मथुरादास माथूर (एमडीएम) रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेच्या काही तासांपूर्वी अनिता यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली होती. “आजपासून तुमची बहीण या जगात पुन्हा दिसणार नाही,” असे त्यांनी पोस्टमध्ये लिहिले होते. या पोस्टनंतर काही वेळातच त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, काही दिवसांपूर्वी तिनं एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या व्हिडिओमुळे अनिताला ट्रोल करण्यात आले. त्यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागत होता. महिलांच्या पोशाखाबाबत त्यांनी शेअर केलेल्या एका व्हिडिओनंतर त्यांच्यावर टीकेची लाट उसळली होती. या प्रकरणामुळे त्यांना मानसिक त्रास होत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

अनिताचे पती दिनाराम यांनी दावा केला की, काही सोशल मीडिया व्यक्तींनी जाणीवपूर्वक त्यांना लक्ष्य केले होते. तसेच बदनामीच्या धमक्या देणारे संदेशही पाठवले जात होते. त्यांनी याबाबत पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता, मात्र अनिताने त्यास नकार दिला होता.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सोशल मीडियावरील ट्रोलिंग, धमक्या आणि इतर बाबींची चौकशी केली जात असून संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे.
Comments
Add Comment

Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ

Tata Javelin Missile : भारतात टाटा बनवणार टँकविरोधी मिसाईल सिस्टीम जॅव्हलिन; अमेरिकन कंपनीसोबत करार

नवी दिल्ली : भारताने अमेरिकेकडून टँकविरोधी मिसाईल सिस्टीम एफजीएम-148 जॅव्हलिन खरेदी करण्याचा करार केला आहे.

Kiren Rijiju : न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानावर किरेन रिजिजू संतप्त

नवी दिल्ली : न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा