धक्कादायक! पंजाबमध्ये खासगी कंपनीत महिला कर्मचाऱ्याची सहकाऱ्याकडून हत्या; आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

पंजाब: पंजाबमधील मोहाली (Mohali crime) येथून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.  एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या महिलेची तिच्याच सहकाऱ्याने चाकूने वार करून हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनतर मोहाली परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हरविंद मन्न असं आरोपीचे नाव आहे. (Punjab Murder Case)


प्राथमिक माहितीनुसार, आरोपी आणि मृत महिला यांच्यात पूर्वी मैत्रीपूर्ण संबंध होते. मात्र, काही वैयक्तिक कारणांमुळे दोघांमध्ये वाद निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. या घटनेचा व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ही घटना गुरुवारी संध्याकाळी कंपनीच्या कार्यालयात घडली. तरुणी नेहमीप्रमाणे आपल्या कार्यालयात काम करत होती. काम सुरू असताना आरोपी अचानक कार्यालयात तीचा एक्स बॉयफेंड आला आणि तिच्यावर हल्ला केला. महिलेने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपीने तिच्यावर वारंवार चाकूने हल्ला केल्याचे समोर आले आहे. कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, परंतु हल्ल्याची तीव्रता जास्त असल्याने ते तिला वाचवू शकले नाहीत.



घटनेनंतर आरोपीने स्वतःलाही चाकूने जखमी करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेनंतर कार्यालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सदर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिस आणि आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल झाल्या. जखमी महिला आणि आरोपी दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी महिलेचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. आरोपीवर सध्या उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.


पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. दोघांमधील नातेसंबंध, अलीकडील घडामोडी आणि वादाचे नेमके कारण याची चौकशी केली जात आहे. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावेही तपासले जात आहेत.


या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू ठेवला आहे.


Comments
Add Comment

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि