Noida Massive Fire : नोएडातील 12 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; रहिवाशांमध्ये घबराट

नोएडा : नोएडातील सेक्टर ७५ परिसरातील आयव्ही काउंटी या निवासी सोसायटीमध्ये शुक्रवारी सकाळी भीषण आग (Massive Fire) लागल्याची घटना घडली. सोसायटीतील एका टॉवरच्या १२ व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये आग लागल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. आगीमुळे मोठ्या प्रमाणात धूर पसरला असून दूरवरूनही काळ्या धुराचे लोट दिसत होते. (Noida Massive Fire)


मिळालेल्या माहितीनुसार, सकाळच्या सुमारास रहिवाशांना फ्लॅटमधून धूर आणि आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या. काही क्षणांतच आग अधिक भडकली आणि फ्लॅटच्या बाल्कनीतून ज्वाळा बाहेर येताना दिसल्या. ही घटना समोर येताच सोसायटीतील नागरिकांमध्ये घबराट पसरली. अनेक रहिवासी तातडीने इमारतीबाहेर आले आणि सुरक्षित ठिकाणी थांबले. सद्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन कर्मचाऱ्यांनी त्वरित बचाव आणि आग नियंत्रणाची मोहीम सुरू केली. आग शेजारच्या फ्लॅटमध्ये किंवा इमारतीच्या इतर भागांमध्ये पसरू नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली.


ही सोसायटी सेक्टर ११३ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असून, पोलिसांनीही घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. प्राथमिक माहितीनुसार, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसेच कोणालाही दुखापत झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही.


अधिकारी सध्या इमारतीची तपासणी करत असून सर्व रहिवासी सुरक्षित असल्याची खात्री केली जात आहे. आगीमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, आग कशामुळे लागली याचा तपास सुरू आहे. अग्निशमन दलाकडून आग पूर्णपणे विझवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

Comments
Add Comment

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि

Dr. Koyyala Ruth John Paul: संघर्षातून यशाकडे! भारतातील तृतीयपंथीयांचा वैद्यकीय क्षेत्रात नवा इतिहास

मुंबई: तृतीयपंथातील अनेक व्यक्तींना आजही सामाजिक भेदभाव, शिक्षणातील अडचणी, रोजगाराच्या मर्यादित संधी आणि