संत कबीर

कोटि कोटि करम लागे रहे,
एक क्रोध की लार।
किया कराया सब गया,
जब आया हंकार॥


या रचनेत संत कबीर म्हणतात, एका क्रोधामुळे कोट्यवधी पापे होत असतात. मनात अहंकार निर्माण झाला की केलेले चांगले कृत्यसुद्धा नष्ट होऊन जाते. क्रोध आणि अहंकार हे माणसाचे सर्वात मोठे शत्रू आहेत. क्रोधामुळे माणसाचा आपल्या मनावरील संयम सुटतो. त्याचा विवेक हरवतो. क्रोधाने तो जणू आंधळा होतो. क्रोधाच्या आवेशात तो अनेक चुकीची कामे करतो. अनेकदा गुन्हेगारी स्वरूपाची वा पापमय कृत्येही त्याच्या हातून घडतात. जेव्हा तो भानावर येतो तेव्हा त्याला आपली चूक उमगते पण तोवर फार उशीर झालेला असतो. क्रोध हा आपला मनाची शांती भंग करणारा एक मनोविकार आहे.



क्रोधावर नियंत्रण न केल्यास क्रोधाची आग मनात सतत जळत राहाते आणि त्या क्रोधाग्नीमुळे माणसाचे अपरिमित नुकसान होते. क्रोधाचा स्वाभाविक परिणाम म्हणजे बदला घेण्याची भावना. यामुळे दुहेरी नुकसान होते. इतरेजणांचे आणि बदला घेणाऱ्याचेही. किंबहुना बदला घेणाऱ्याचे नुकसान अधिक होते. माणसाचा दुसरा शत्रू आहे गर्व वा अहंकार. सतःला इतरांपेक्षा वेगळे वा श्रेष्ठ समजणे याचे नाव आहे अहंकार. माणूस जेव्हा केवळ स्वतःविषयीच विचार करतो तेव्हा अहंकाराची भावना निर्माण होते. अहंकारी व्यक्तीचे जग त्याच्यापासून सुरू होते आणि लाच्यापाशीय सपून जाते.



सारी दुनिया आपल्याभोवती फिरते आहे असा त्याला भास होतो.
अनेक संतांनी अहंकाराविषयी लिहिले आहे. संत ज्ञानेश्वर म्हणतात,
विवेक द्वेषे अहंकारु। पोषूनि तैसा॥
(ज्ञाने. १८/१२७८)
(विवेकाचा त्याग करणारा माणूस अहंकार पोसत असतोः)
संत एकनाथ म्हणतात, ज्याच्याમાનું अंगी देहाभिमान ।
त्यासी भक्तपण कदा न घडे ॥ (ज्याच्या अंगी अहंकार असतो तो भक्त होऊ शकत नाही) संत तुकाराम म्हणतात,
गर्व ताठा हे अज्ञाনन । मरण सवे वाहातसे ॥ (अज्ञानी माणून  गर्व आणि ताठा यांच्या रूपाने मरणच जवळ बाळगत असतो.)
संत कबीर यांनी क्रोध आणि अहंकार यामुळे माणसाची चांगली कृत्येही प्रभावहीन होतात, हे वास्तव नेमकेपणाने सांगितले आहे.


__- डॉ. देवीदास पोटे

Comments
Add Comment

Shardiya Navratri 2026: नवरात्रीत एका दिवशी पडणार दोन माळ, अष्टमी आणि नवमी तिथीबाबत जाणून घ्या

हिंदू धर्मात शारदीय नवरात्रोत्सवचं विशेष महत्त्व आहे. या नऊ दिवसात देवीचा जागर केला जातो. देवीच्यी नऊ रुपांची

Gauri Avahan 2026 : ‘आली आली गौराई, सोन्याच्या पावलांनी’; जाणून घ्या आवाहनाचा मुहूर्त, नैवेद्य आणि विसर्जनाची तारीख

Gauri Avahan 2026 : “आली आली गौराई, सोन्याच्या पावलांनी…” या पारंपरिक गीताच्या सुरांनी आज महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये

दशदिक्षु स्थितं दैवं, दशशक्तिसमन्वितम्

प्रभाती सूर नभी रंगती दशदिशा भूपाळी म्हणती पानोपानी अमृत शिंपित उषा हासरी हसते धुंदीत जागी होऊन फुले

नको देवराया अंत आता पाहू । प्राण हा सर्वथा जाऊ पाहे ।।

कान्हो, ते तुझ्यासाठी केलेले दागिने काय पेटीत ठेवण्यासाठी केले आहेत? जरा अंगावर घाल, बिदरचे सरदार येणार आहेत आज

संत ज्ञानेश्वर

योगिया दुर्लभ तो म्यां देखिला साजणी । पाहातां पाहातां मना नपुरे धणी ॥१॥ देखिला देखिला माये देवाचा देवो । फिटला

संत मुक्ताबाई

प्रकृती निर्गुण प्रकृती सगुण। दीपें दीप पूर्ण एका तत्त्वे।। देखिले गे माये पंढरी पाटणी। पुंडलिका अंगणी