कधी सुरू होणार नवरात्रोत्सव? अष्टमी-नवमी तिथीचं काय?
पंचांगानुसार, शारदीय नवरात्रीला 11 ऑक्टोबर, रविवारपासून सुरूवात होणार आहे. अश्विन महिन्याच्या प्रतिपदेला घटस्थापना होईल. त्यानंतर नवरात्रोत्सवर 19 ऑक्टोबरला असेल.म्हणजेच यंदा नवरात्रोत्सव नऊ दिवस असणार आहे. तर 20 ऑक्टोबरला दसरा असणार आहे. पण नवरात्रोत्सवर नऊ दिवसांचा असला तरी 19 ऑक्टोबरला अष्टमी आणि नवमीची तिथी आहे. पंचांगानुसार, अष्टमी तिथीला 18 ऑक्टोबरला सकाळी 8 वाजून 27 मिनिटांना सुरूवात होईल. ही तिथी दुसऱ्या दिवशी म्हणजेच 19 ऑक्टोबरच्या सकाळी 10 वाजून 51 मिनिटांपर्यंत राहिल. त्यानंतर नवमी तिथी सुरू होईल. म्हणजे 19 ऑक्टोबरला सकाळी 10 वाजून 51 मिनिटांपर्यंत अष्टमी तिथी असेल.
Sharadiya Navratri 2026 : हिंदू धर्मात देवी दुर्गेच्या उपासनेसाठी शारदीय नवरात्र हा अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र सण मानला जातो. अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या ...
19 ऑक्टोबरला दोन्ही तिथी एकत्र असल्यानने अष्टमी आणि नवमी संदर्भातील दोन्ही धार्मिक विधी त्याच दिवशी केल्या जातील. म्हणजेच या दिवशी दुर्गाष्टमी, महागौरी पूजा, कन्या पूजन आणि महानवमी पूजन केलं जाईल. त्यामुळे 19 ऑक्टोबर 2026 हा दिवस खास आणि महत्त्वाचा असणार आहे. या दिवशी अष्टमीशी निगडीत होम होईल. इतकंच काय तर नवमी तिथीही त्याच दिवशी सुरू होणार असल्याने महागौरी पूजा, दुर्गाष्टमी, कन्या पूजन आणि इतर धार्मिक कार्य पार पाडली जातील.