Rules For Edible Oil:  खाद्यतेल विक्रीचे नियम बदलणार! केंद्राचा मोठा निर्णय, आता फक्त ९ पॅक साइजमध्येच मिळणार तेल

सर्वसामान्य ग्राहकांची दिशाभूल रोखण्यासाठी आणि बाजारपेठेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी केंद्र सरकारने खाद्यतेल (Edible oil) विक्रीसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाने कायदेशीर मापनशास्त्राच्या नियमांमध्ये बदल करत खाद्यतेलासाठी प्रमाणित पॅक आकार निश्चित केले आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी पुढील तीन महिन्यांत देशभरात केली जाणार आहे. (Rules For Edible Oil)


नवीन नियमांनुसार खाद्यतेल आता ठराविक ९ पॅक आकारांमध्येच विकले जाणार आहे. यामध्ये २०० मिली किंवा ग्रॅम, ५०० मिली किंवा ग्रॅम, १ लिटर किंवा किलो २, ३, ४, ५, १५ आणि २० लिटर किंवा किलो या आकारांचा समावेश आहे. यामुळे ग्राहकांना वेगवेगळ्या कंपन्यांच्या उत्पादनांच्या किमती सहजपणे तुलना करता येतील.



सरकारच्या मते, बाजारात विविध आकारांच्या पॅकेट्समुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण होत होता. अनेकदा पॅकच्या आकारामुळे किंमतींची योग्य तुलना करणे कठीण जात होते. नवीन नियमांमुळे ही समस्या कमी होण्याची अपेक्षा आहे.


हे नियम पाम तेल, सोयाबीन तेल, सूर्यफूल तेल, मोहरी तेल, शेंगदाणा तेल, तीळ तेल, राईस ब्रॅन तेल, कापूस बियांचे तेल, मका तेल तसेच सर्व प्रकारच्या मिश्रित खाद्यतेलांना लागू असतील. देशांतर्गत उत्पादनांसोबतच आयात केलेल्या खाद्यतेलांनाही हे नियम लागू राहणार आहेत.


याशिवाय, जर एखाद्या पॅकवर तेलाचे प्रमाण लिटर किंवा मिलीमध्ये नमूद केले असेल, तर त्यासोबत त्याचे वजन किलो किंवा ग्रॅममध्ये लिहिणेही बंधनकारक करण्यात आले आहे.


मात्र, २०० मिली किंवा २०० ग्रॅमपेक्षा कमी प्रमाणातील छोट्या पॅकेट्सना या नियमांमधून सवलत देण्यात आली आहे. ग्राहकांना परवडणारे छोटे पॅक उपलब्ध राहावेत, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.


उद्योग क्षेत्रातील अनेक संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले असून यामुळे बाजारात एकसमानता आणि शिस्त निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

Viral Video : धावत्या बाईकवर उभे राहून तरुणाचा धोकादायक स्टंट; व्हिडीओ व्हायरल, सारण पोलिसांकडून FIR दाखल

Viral Video : सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही जण सार्वजनिक रस्त्यांवर धोकादायक स्टंट करत असल्याचे प्रकार

Jharkhand Accident News: पत्नीच्या शिक्षकपदी निवडीचा आनंद ठरला अखेरचा प्रवास; भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू

Jharkhand Accident News: पत्नीची शिक्षकपदी निवड झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी मंदिरात निघालेल्या एका कुटुंबावर काळाने घाला

Uttar Pradesh Viral video : हुंड्याच्या हव्यासापोटी मागितली थेट 'महिंद्रा थार'; वधूच्या कुटुंबीयांनी भरमांडवात दाखवला आरसा!

Uttar Pradesh Viral video: हुंड्याच्या मागणीला उत्तर देण्यासाठी वधूच्या कुटुंबीयांनी अनोखी शक्कल लढवल्याची घटना उत्तर

Haridwar Pod Taxi : हरिद्वारमध्ये 3,028 कोटींचा पॉड टॅक्सी प्रकल्प; हर की पौरी, मनसा देवीसह प्रमुख ठिकाणे जोडणार

Haridwar Pod Taxi : हरिद्वारमध्ये धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्या भाविकांना आणि पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू

Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेसच्या जेवणात आढळला लोखंडी बोल्ट; प्रवाशाचा व्हिडिओ व्हायरल, IRCTCकडून माफी

Vande Bharat Express: वंदे भारत एक्सप्रेसमधील जेवणाच्या गुणवत्तेबाबत गंभीर तक्रार समोर आली आहे. बंगळूरुहून बेळगावीला प्रवास

Haridwar Kumbh 2027 : हरिद्वार कुंभ 2027 मध्ये ‘नेत्र कुंभ’चे आयोजन; 1.5 लाख भाविकांची मोफत नेत्रतपासणी, 10 हजार शस्त्रक्रियांचे लक्ष्य

Haridwar Kumbh 2027: हरिद्वार कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी 45 दिवसांचे ‘नेत्र कुंभ’ महाशिबिर आयोजित करण्यात