Flight Incident : दिल्लीत आलेल्या वादळाचा एअर इंडियाच्या तीन विमानांना तडाखा

नवी दिल्ली : दिल्लीत इंदिरा गांधी आंतराष्ट्रीय विमातळावर रविवारी संध्याकाळी ४:३० च्या दरम्यान अचानक जोरात वादळी वारे वाहू लागले. या वाऱ्यामुळे विमानांजवळ ठेवलेली शिडी (जिने / ग्राउंड हँडलिंग उपकरण) आपल्या जागेवरून सरकली आणि थेट एअर इंडियाच्या तीन लहान विमानांना धडकली. या धडकेमुळे तिन्ही विमानांचे नुकसान झाले. विमानतळावरील या घटनेनंतर एअर इंडियाने तिन्ही लहान विमानांची उड्डाणं रद्द केली आहेत. दुरुस्तीसाठी आणि तपासणीसाठी तिन्ही विमाने सेवेतून काढून घेण्यात आली आहेत.



वादळी वाऱ्यांबाबत पूर्वसूचना देण्यात आली नव्हती. यामुळे ग्राउंड स्टाफने वादळी वाऱ्यांना सामोरे जाण्यासाठी तयारी केली नव्हती. वादळ आले त्यावेळी विमानांजवळ ठेवलेली शिडी (जिने / ग्राउंड हँडलिंग उपकरण) आपल्या जागेवरून सरकली आणि थेट एअर इंडियाच्या तीन लहान विमानांना धडकली, अशी माहिती दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड या संस्थेने दिली आहे. विमानांना धडकलेली शिडी ही एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आणि इंडिगोच्या ग्राउंड हँडलिंग ऑपरेशन्सची होती. यामुळे विमान वाहतुकीवर परिणाम झाला. या प्रकरणी नियमानुसार चौकशी सुरू असल्याचेही दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड या संस्थेने सांगितले.



एअर इंडियाच्या बाधित झालेल्या तीन विमानांपैकी दोन लवकरच सेवेत परत येण्याची शक्यता आहे, तर तिसऱ्या विमानाच्या दुरुस्तीला अधिक वेळ लागू शकतो.


भारतीय हवामान विभागाने दिल्लीला मेघगर्जनेसह पावसासाठी तयार राहण्याचा सल्ला दिला आहे, कारण पुढील काही दिवस हवामान अस्थिर राहण्याची शक्यता आहे.११ जूनपर्यंत मुंबई आणि ठाण्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे, तसेच महाराष्ट्राच्या काही भागांत सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता वर्तवली आहे.

Comments
Add Comment

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि