सरबजोत, लक्षिता, अखिल आणि साक्षीचा सुवर्णवेध

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी दावेदारी भक्कम


डेहराडून: उत्तराखंडमधील डेहराडून येथे महाराणा प्रताप स्पोर्ट्स कॉलेजच्या त्रिशूल शूटिंग रेंजवर सुरू असलेल्या रायफल आणि पिस्तूल नेमबाजांच्या टी-४ राष्ट्रीय निवड चाचणीच्या उपांत्य दिवशी ऑलिम्पिक पदकविजेता सरबजोत सिंग, सैन्यदलाची नेमबाज लक्षिता, जागतिक स्पर्धेतील पदकविजेता अखिल श्योराण आणि महाराष्ट्राची साक्षी सुनील पाडेकर यांनी आपापल्या गटात विजेतेपद पटकावत आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी आपली दावेदारी अधिक मजबूत केली.पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत पॅरिस ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता सरबजोत सिंग याने अंतिम फेरीत २४५.९ गुणांसह अव्वल स्थान पटकावले. सैन्यदलाच्या अजेंद्र सिंग चौहानने अखेरपर्यंत कडवी झुंज देत २४५.१ गुणांसह दुसरे स्थान मिळविले. तर विद्यमान विश्वविजेता सम्राट राणा २२१.५ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिला. हरियाणाच्या कमलजीत चौधरीने चौथे स्थान मिळविले, तर पात्रता फेरीत अव्वल राहिलेला सौरभ चौधरी अंतिम फेरीत पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले.



पात्रता फेरीत सौरभने ५८३-२१ एक्स गुणांसह अव्वल स्थान मिळविले होते. महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत दिवसातील सर्वाधिक रोमांचक लढत पाहायला मिळाली. पात्रता फेरीत आठव्या क्रमांकाने अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या सैन्यदलाच्या लक्षिताने अत्यंत संयमित कामगिरी करत २४०.० गुणांसह विजेतेपद मिळविले. हरियाणाच्या सुरभी रावला केवळ ०.२ गुणांनी पराभव स्वीकारावा लागला. सुरभीने २३९.८ गुण मिळविले. उत्तर प्रदेशच्या मानसी आनंदने २२०.२ गुणांसह तिसरे स्थान मिळविले. ऑलिम्पियन मनू भाकर पात्रता फेरीत अव्वल असली तरी अंतिम फेरीत सहाव्या स्थानावर राहिली. तर म्युनिक विश्वचषकातील सुवर्णपदक विजेत्या सुरुची आणि पालक यांनी पात्रता मिळवूनही अंतिम फेरीत सहभाग घेतला नाही.पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री-पोझिशन्स स्पर्धेत उत्तर प्रदेशच्या अखिल श्योराणने नौदलाच्या निरज कुमारला केवळ ०.२ गुणांनी मागे टाकत विजेतेपदावर कब्जा केला. अखिलने ३५८.३ गुण मिळविले, तर निरज ३५८.१ गुणांसह दुसऱ्या स्थानावर राहिला. जागतिक स्पर्धेतील पदकविजेता ऐश्वर्य प्रतापसिंग तोमरने ३४५.४ गुणांसह तिसरे स्थान मिळविले. ऑलिम्पियन चैनसिंग चौथ्या स्थानावर राहिला. पात्रता फेरीत ऐश्वर्य प्रतापसिंग तोमरने ५९१-३५ एक्स गुणांसह अव्वल स्थान मिळविले होते.



महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री-पोझिशन्स स्पर्धेत महाराष्ट्राच्या साक्षी सुनील पाडेकरने शानदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीत तिने कर्नाटकच्या तिलोत्तमा सेनवर मात केली. साक्षीने ३५८.२ गुणांची कमाई केली, तर तिलोत्तमाने ३५७.८ गुण मिळविले. मध्य प्रदेशच्या आशी चौकसेने ३४५.५ गुणांसह तिसरे स्थान पटकावले.केरळच्या विदर्शा के. विनोद चौथ्या स्थानावर राहिली, तर ऑलिम्पियन अंजुम मौदगिल आणि सिफ्त कौर सामरा अनुक्रमे पाचव्या व सहाव्या स्थानावर राहिल्या. पात्रता फेरीत साक्षीने ५८९-३६ एक्स गुणांसह तिसरे स्थान मिळविले होते. त्यानंतर अंतिम फेरीत उत्कृष्ट कामगिरी करत तिने टी-४ चाचणीचे विजेतेपद आपल्या नावावर केले.दरम्यान, अद्ययावत राष्ट्रीय क्रमवारीत पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात केदारलिंग बालकृष्ण उचगांवकर अव्वल स्थानी असून गौरव कुमार आणि कमलजीत चौधरी अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. महिलांमध्ये सुरुचीने अव्वल स्थान कायम राखले असून सैन्यम आणि ईशा सिंग तिच्या पाठोपाठ आहेत.



पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री-पोझिशन्स क्रमवारीत ऐश्वर्य प्रतापसिंग तोमर आघाडीवर आहे, तर निरज कुमार आणि रुद्रांक्ष पाटील अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहेत. महिलांच्या गटात आशी चौकसे अव्वल असून विदर्शा के. विनोद आणि तिलोत्तमा सेन अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहेत.टी-४ राष्ट्रीय निवड चाचणीचा समारोप बुधवारी पुरुष आणि महिलांच्या ५० मीटर रायफल प्रोन स्पर्धेने होणार आहे. त्यानंतर आगामी आशियाई क्रीडा स्पर्धा तसेच आयएसएसएफ विश्वचषक हांगझोऊसाठी भारतीय रायफल आणि पिस्तूल संघाची निवड जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या स्पर्धेतील निकालांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

Comments
Add Comment

Team India : अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, अय्यर कर्णधार; बुमराह, सॅमसन, सूर्यवंशीला संधी

नवी दिल्ली : अफगाणिस्तानविरुद्ध सप्टेंबरमध्ये होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा

MCA Captaincy : सिद्धेश लाड कडे मुंबईच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईला सलग दुसऱ्या रणजी करंडक हंगामासाठी नवीन कर्णधार मिळणार आहे. अनुभवी फलंदाज सिद्धेश लाड २०२६-२७ च्या

Duleep Trophy Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीचं शतक अवघ्या ८ धावांनी हुकलं; सचिनचा 'तो' विक्रम मोडण्याची संधी गमावली

नवी दिल्ली : दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Sooryavanshi) दमदार फलंदाजी करत सर्वांचे

Lionel Messi : मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

अर्जेंटिना : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली

Tiwana Football Club : वांद्र्यातील नेव्हिल डि'सूजा फुटबॉल मैदानावर तिवाना संघाची बाजी

- मुंबई फुटबॉल असोसिएशन फर्स्ट डिव्हिजन २०२६ च्या चषकावर कोरले नाव मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई फुटबॉल

India vs Thailand Women T20 Asia Cup 2026 : भारताचा थायलंडवर ९४ धावांनी दणदणीत विजय; शेफाली वर्माची तुफानी खेळी

दुबई : महिला टी-२० आशिया कप २०२६च्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने थायलंडचा ९४ धावांनी पराभव