PM Narendra Modi 'X' Post : 'जनसेवा हाच खरा धर्म'!; ऐतिहासिक विक्रमानंतर पंतप्रधान मोदींचं ट्वीट चर्चेत

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी भारतीय राजकारणाच्या इतिहासात आणखी एक सुवर्णपान जोडले आहे. सलग ४,३९९ दिवस पंतप्रधानपद भूषवत त्यांनी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू (Jawaharlal Nehru) यांचा विक्रम मागे टाकत देशातील सर्वाधिक काळ सलग सेवा देणारे पंतप्रधान (Prime Minister) होण्याचा मान मिळवला आहे.


या ऐतिहासिक टप्प्यानंतर देश-विदेशातून पंतप्रधान मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या विशेष प्रसंगी त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर (X) एक भावनिक आणि प्रेरणादायी संदेश शेअर करत “जनसेवा हीच सुशासनाची सर्वात मोठी कसोटी आहे,” असे म्हटले.



‘जनसेवा हाच धर्म’; मोदींनी शेअर केला संस्कृत श्लोक


“सदानुरक्तप्रकृतिः प्रजापालनतत्परः।
विनीतात्मा हि नृपतिर्भूयसी श्रियमश्नुते॥”


या सुभाषिताचा अर्थ स्पष्ट करताना त्यांनी म्हटले की, जो लोकप्रतिनिधी सेवा हाच आपला धर्म मानून सातत्याने जनहितासाठी कार्य करतो, सुशासनाद्वारे जनतेचे कल्याण आणि सुरक्षा सुनिश्चित करतो तसेच विनम्रता, संयम आणि कर्तव्यनिष्ठेने समाजाच्या विकासासाठी समर्पित राहतो, त्यालाच जनतेचा विश्वास, यश आणि समृद्धी प्राप्त होते.





नेहरूंचा विक्रम मोडीत; ४,३९९ दिवसांचा सलग कार्यकाळ


नरेंद्र मोदी सध्या पंतप्रधान म्हणून सलग तिसऱ्या कार्यकाळात आहेत. त्यांनी ४,३९९ दिवसांचा सलग कार्यकाळ पूर्ण करत जवाहरलाल नेहरू यांच्या नावावरील विक्रम मागे टाकला आहे. नेहरूंचा १९५२ नंतरचा कार्यकाळ हा या तुलनेचा आधार मानला जातो, कारण १९४७ ते १९५२ या काळात ते अंतरिम सरकारचे प्रमुख होते.



सलग तीन लोकसभा विजय मिळवणारे पहिले पंतप्रधान


माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीही १४ वर्षांहून अधिक काळ देशाचे नेतृत्व केले होते, मात्र त्यांचा कार्यकाळ सलग नव्हता. नरेंद्र मोदी यांनी २०१४, २०१९ आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवत सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची धुरा सांभाळली आहे. त्यामुळे लोकशाही प्रक्रियेतून सलग तीन वेळा जनतेचा कौल मिळवून देशाचे नेतृत्व करणारे ते भारताच्या इतिहासातील पहिले पंतप्रधान ठरले आहेत. पंतप्रधान मोदींच्या या ऐतिहासिक विक्रमाकडे भारतीय लोकशाहीच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून पाहिले जात आहे.

Comments
Add Comment

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि

Dr. Koyyala Ruth John Paul: संघर्षातून यशाकडे! भारतातील तृतीयपंथीयांचा वैद्यकीय क्षेत्रात नवा इतिहास

मुंबई: तृतीयपंथातील अनेक व्यक्तींना आजही सामाजिक भेदभाव, शिक्षणातील अडचणी, रोजगाराच्या मर्यादित संधी आणि