Chhatrapati Sambhajinagar : १५ वर्षांचं प्रेम अवघ्या ७ दिवसांत संपलं; नवविवाहितेचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर शहरात डोळ्यात टचकन पाणी येईल अशी धक्कादायक घटना समोर आली आहे.लग्नानंतर अवघ्या सात दिवसांतच एका नवविवाहितेचा अचानक चक्कर येऊन पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटने नंतर नववधू आणि मुलीकडच्या माहेरची मंडळी आणि मित्रपरिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.



मिळलेल्या माहिती नुसार :
मृत नवविवाहितेचे नाव दीपाली लिनहार आहे.दीपाली आणि संदीप खंडाळे हे गेल्या 15 वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात होते. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला दोन्ही कुटुंबाकडून या लग्नासाठी विरोध होता पण दीपाली आणि संदीप यांनी एकमेकांची साथ सोडली नाही. त्यांनी आपल्या कुटुंबाची समजूत काढली त्यानंतर दोन्ही कुटुंबांच्या संमतीने 4 जून रोजी अत्यंत उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात त्यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. १५ वर्षाच्या प्रेमाचं रूपांतरण लग्नात झालं दोन्ही बाजूंचे मित्रपरिवार आणि नातेवाईक खूप खुश होते पण काळाने घात केला आणि दोन्ही कुटुंबियांना मोठा धक्का बसला.



माहेरीचं झाला घात
लग्न सुरळीतपणे पार पडलं मुलीचं थाटामाठात सासरी स्वागत झालं. लग्ना नंतरच्या सर्व विधी पार पडल्या आणि दीपाली पाचपरतवनासाठी आपल्या माहेरी आली. संध्याकाळच्या सुमारास दीपाली बाथरूममध्ये गेली असताना अचानक चक्कर आली आणि ती खाली कोसळली.कुटुंबीयांनी क्षणाचाही विलंब न लावता तिला तत्काळ वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचाराआधी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. काही दिवसापूर्वी ज्या घरात आनंदाचं आणि खेळीमेळीच वातावर होत तिथे आता फक्त आणि फक्त आक्रोश आणि हुंदके ऐकू येत आहेत. काळाने दिपालीला हिरावून नेले. नव्या आयुष्याची खऱ्या अर्थाने सुरुवात होण्यापूर्वीच हा आनंदाचा प्रवास इतक्या दुर्दैवी वळणावर जाऊन थांबेल असं कोणालाही वाटलं नव्हतं.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी