Raigad Accident : जेएनपीटी परिसरात भीषण स्फोट; दोन कामगारांचा मृत्यू

रायगड : जेएनपीटी परिसरातील जेएसडब्ल्यू ऑइल जेट्टीवर रविवारी सकाळी झालेल्या भीषण स्फोटात दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तेलवाहिनी पिगिंगचे काम सुरू असताना हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.या दुर्घटनेत करावली (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) येथील राजेंद्र शिंदे आणि उरण तालुक्यातील पिरकोन येथील गजानन गावंड यांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी सुमारे ९ वाजता जेट्टी परिसरात काम सुरू असताना अचानक स्फोट झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली.


घटनेनंतर दोन्ही मृतदेह उरण येथील इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा व प्राथमिक तपास सुरू केला आहे. तसेच जेएनपीटी प्रशासनाकडूनही स्वतंत्र चौकशी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.दरम्यान, पिगिंगसारख्या धोकादायक कामादरम्यान सुरक्षा नियमांचे पालन झाले का, याबाबत कामगार संघटना आणि स्थानिक नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. हेल्मेट, गॅस टेस्टिंग आणि ‘परमिट टू वर्क’ प्रक्रियेचे पालन झाले नसल्याचा आरोपही काही संघटनांकडून करण्यात येत आहे.या घटनेनंतर जेट्टीवरील कामकाज तात्पुरते थांबविण्यात आले असून, दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

Jaykumar Rawal : अत्याधुनिक सुविधा आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत मुंबई विमानतळाजवळ ‘नंदगिरी राज्य अतिथीगृह’ उभारणार; मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

मुंबई : विविध राज्यांतून मुंबईत येणाऱ्या मान्यवर अतिथींच्या निवासासोबतच ट्रान्झिट प्रवासादरम्यान

Nitesh Rane : मालेगावमध्ये आधुनिक मासळी बाजार उभारणीला गती

- सांगलीतील प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : वाशिम जिल्ह्यातील

Nitesh Rane : सिंधुदुर्गात कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी प्रभावी कार्यवाहीचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांची माहिती

कुक्कुटपालनाला 'कृषी समकक्ष' दर्जा दिल्याने युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात

ITR Filing 2026 : देशात आयटीआर भरणाऱ्यांचा विक्रमी आकडा; ७.८ कोटींचा टप्पा पार

नवी दिल्ली : देशात आयकर रिटर्न (आयटीआर) दाखल करणाऱ्यांची संख्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. मूल्यांकन वर्ष

Chandrashekhar Bawankule : अर्थसंकल्पातील मंजूर निधी ओबीसी मंत्रालयाला द्या; ओबीसी मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी

ओबीसी महामंडळांचे प्रश्न डिसेंबरपर्यंत मार्गी परदेशी शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थी संख्या वाढविणार बैठकीत १३

Russia Ukraine War : रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात एका भारतीयासह १२ जणांचा मृत्यू

कीव्ह : रशियाने युक्रेनवर रात्रभर केलेल्या भीषण हवाई हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा आणि इतर ११ जणांचा अशा एकूण १२