Madhya Pradesh : अफवा पसरली आणि रेल्वे रुळावर मोठी दुर्घटना झाली

मोरेना : मध्य प्रदेशमधील मोरेना जिल्ह्यातील हेतमपूर - घेर विभागाजवळ अफवा पसरल्यामुळे रेल्वे रुळावर मोठी दुर्घटना झाली. घाबरलेल्या प्रवाशांनी धावत्या गाडीतून रुळांवर उड्या मारल्या. त्याचवेळी समोरच्या रुळांवरून वेगाने आलेल्या गाडीने प्रवाशांना धडक दिली. यामुळे चार जणांचा रुळांवरच मृत्यू झाला.



अपघात प्रकरणी एका प्रवाशाने माहिती दिली. इंटरसिटीमध्ये आग लागल्याची बातमी पसरली. याच सुमारास गाडीचा वेग कमी झाला आणि गाडी रुळांवर थांबली. गाडी थांबण्याचे नेमके कारण माहिती नाही. पण आग लागल्याचे ज्यांनी ऐकले त्यापैकीच काही प्रवासी धावत्या गाडीतून उड्या मारून रुळांवर उतरले. नेमकी त्याचवेळी समोरच्या रुळांवरून वेगाने एक गाडी आली. इंटरसिटीमधून उड्या मारलेल्यांपैकी सर्वांना रुळ ओलांडून बाजूला होण्याची संधी मिळाली नाही. वेगाने आलेल्या गाडीने प्रवाशांना धडक दिली. यामुळे चार जणांचा रुळांवरच मृत्यू झाला; असे प्रत्यक्षदर्शी प्रवाशाने प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले.



एक महिला प्रवासी आणि तिचे मूल यांचा रेल्वेची धडक बसल्याने मृत्यू झाला त्यावेळी त्या महिलेचा पती दुसऱ्या मुलाला घेऊन गाडीतून उतरण्याची तयारी करत होता. पती आणि दुसरे मूल उतरले नसल्यामुळे सुरक्षित राहिले.या प्रकरणी चौकशी होणार आहे.

Comments
Add Comment

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि

Dr. Koyyala Ruth John Paul: संघर्षातून यशाकडे! भारतातील तृतीयपंथीयांचा वैद्यकीय क्षेत्रात नवा इतिहास

मुंबई: तृतीयपंथातील अनेक व्यक्तींना आजही सामाजिक भेदभाव, शिक्षणातील अडचणी, रोजगाराच्या मर्यादित संधी आणि