Ahilyanagar : जिल्ह्यातील धरणांनी गाठला तळ! पाणीसाठा घसरला अवघ्या २४.५४ टक्क्यांवर

अहिल्यानगर : जिल्ह्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठ्याने जूनच्या पहिल्याच आठवड्यात तळ गाठला असून, एकूण साठा अवघ्या २४.५४ टक्क्यांवर घसरला आहे. वाढते बाष्पीभवन, रब्बी आणि उन्हाळी पिकांसाठी मोठ्या प्रमाणात झालेला पाण्याचा वापर, बिगरसिंचनासाठी सोडलेले आवर्तन तसेच पाणलोट क्षेत्रात अद्याप पावसाने हजेरी न लावल्याने ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह प्रशासनाची चिंता वाढली आहे.



जिल्ह्यातील धरणांनी गाठला तळ


प्रशासनाच्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील मुळा, भंडारदरा, निळवंडे यांसह सर्व धरणांमध्ये सध्या केवळ १२ हजार ५३८ दशलक्ष घनफूट इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. हा साठा एकूण क्षमतेच्या फक्त २४.५४ टक्के आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ५ हजार ८६२ दशलक्ष घनफूट म्हणजेच जवळपास पावणेसहा टीएमसीने पाणी कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे.


गेल्या वर्षी जून महिन्यापासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली होती. ऑगस्टपर्यंत भंडारदरा, मुळा आणि निळवंडे धरणे ओव्हरफ्लोच्या उंबरठ्यावर पोहोचली होती. सप्टेंबरमध्येही मुसळधार पावसामुळे भूजलपातळीत वाढ झाली होती. त्यामुळे रब्बी हंगामासाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध झाला होता. मात्र, यंदा परिस्थिती पूर्णपणे उलट दिसून येत आहे.



उन्हाचा वाढता तडाखा आणि पाण्याचे मोठ्या प्रमाणावर झालेले बाष्पीभवन यामुळे धरणांतील साठा झपाट्याने घटला आहे. भंडारदरा धरणातून प्रवरा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले असून, सिंचन व बिगरसिंचनासाठीही आवर्तन सुरू आहे. त्यामुळे अनेक धरणांनी जूनमध्येच तळ गाठल्याचे चित्र आहे.


धरणांतील शिल्‍लक पाणी तसेच कमी पावसाची शक्‍यता लक्षात घेऊन शासनाने जिल्‍हाभरातील पाणीसाठा आरक्षित ठेवण्‍याचे निर्देश दिले असून, नद्या, तलाव व इतर जलस्रोतांमधून होणारा अनधिकृत व बेकायदेशीर पाणीउपसा करणार्‍यावर कारवाईचे आदेश दिले आहेत. भारतीय हवामान विभागाने यंदा ‘एल निनो’चा प्रभाव राहण्याची शक्यता व्यक्त केल्याने पर्जन्यमान घटण्याची भीती असून, अद्याप मान्सून दाखल न झाल्याने शेतकरी चिंतातूर बनला आहे.



जिल्ह्यातील प्रमुख धरणांतील सध्याचा पाणीसाठा (दशलक्ष घनफूट/टक्केवारी):


भंडारदरा – २३६५ (२१.४२%)


निळवंडे – १९८२ (२३.८२%)


मुळा – ६७६६ (२६%)


आढळा – ३७४ (३५%)


सीना – ८१६ (३४%)


खैरी – १०५.३५ (१९.७७%)


विसापूर – १०३.२८ (११.४१%)


घाटशीळ – ९४ (२१.५१%)


मांडओहळ – ४८.७६ (१२.२२%)


घाटशीळ – ९४ (२१.५१%)

Comments
Add Comment

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने

राज्यातील १०२ आणि १०८ रुग्णवाहिका सेवांचे होणार एकत्रीकरण - वर्ष अखेरीस ४ हजार ५०० नव्या रुग्णवाहिका

मुंबई : राज्यातील आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि वेगवान करण्यासाठी १०२ आणि १०८ या रुग्णवाहिका सेवांचे

Pratap Sarnaik : एसटीचा १५ टक्के हंगामी भाडेवाढीचा प्रस्ताव नामंजूर, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना दिलासा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय

मुंबई : दुष्काळ आणि महागाईमुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा देण्यासाठी एसटी

Maharashtra weather : महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अंदाज; कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता, मुंबईत उकाडा वाढणार

मुंबई : महाराष्ट्रात एकीकडे उष्णतेचा तडाखा वाढत असताना दुसरीकडे काही भागांत अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे संकट