FIFA World Cup 2026 England vs Croatia : हॅरी केनचा दणका, इंग्लंडची विजयी सलामी! क्रोएशियावर ४-२ ने मात करत गट एलमध्ये दमदार सुरुवात

डॅलस: फिफा विश्वचषक २०२६ मध्ये इंग्लंडने आपल्या मोहिमेची शानदार सुरुवात करत क्रोएशियाचा ४-२ अशा फरकाने पराभव केला. डॅलस स्टेडियमवर झालेल्या गट एलमधील या थरारक सामन्यात कर्णधार हॅरी केनने दोन गोल झळकावत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. दुसऱ्या हाफमध्ये ज्युड बेलिंगहॅम आणि मार्कस रॅशफोर्ड यांनी प्रत्येकी एक गोल करत इंग्लंडचा विजय निश्चित केला.


सामन्याच्या सुरुवातीपासूनच इंग्लंडने आक्रमक खेळ केला. हॅरी केनने पेनल्टीवर गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. मात्र, क्रोएशियाच्या मार्टिन बटुरिनाने बरोबरी साधत इंग्लंडला धक्का दिला. त्यानंतर केनने शानदार हेडरद्वारे पुन्हा एकदा इंग्लंडला आघाडी मिळवून दिली. पण पेटार मुसाने गोल करत क्रोएशियाला पुन्हा सामन्यात परत आणले आणि पहिला हाफ २-२ अशा बरोबरीत संपला.


दुसऱ्या हाफमध्ये मात्र इंग्लंडचा खेळ पूर्णपणे बदललेला दिसला. ज्युड बेलिंगहॅमने निर्णायक गोल करत इंग्लंडला ३-२ अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर इंग्लंडने सातत्याने आक्रमण करत क्रोएशियाच्या बचावफळीवर दबाव कायम ठेवला.



सामन्याच्या 86व्या मिनिटाला मार्कस रॅशफोर्डने गोल करत क्रोएशियाच्या पुनरागमनाच्या आशा संपुष्टात आणल्या. बुकायो साकाच्या अचूक पासवर रॅशफोर्डने बचावपटूला चकवून चेंडू जाळ्यात धाडला आणि इंग्लंडची आघाडी ४-२ अशी वाढवली. क्रोएशियाचा अनुभवी कर्णधार आणि पाचव्या विश्वचषकात खेळणारा लुका मॉड्रिक (Luka Modric) याने संघाचे नेतृत्व केले. हा त्याचा देशासाठीचा १९९ वा सामना होता. मात्र इंग्लंडच्या वेगवान आणि आक्रमक खेळापुढे क्रोएशियाला हार मानावी लागली.



या सामन्यात दोन्ही गोलरक्षकांनी उत्कृष्ट बचाव केले. इंग्लंडचा जॉर्डन पिकफर्ड आणि क्रोएशियाचा डॉमिनिक लिवाकोविच यांनी अनेक शानदार सेव्ह करत चाहत्यांना खिळवून ठेवले. विशेषतः लिवाकोविचच्या काही अप्रतिम बचावांमुळे इंग्लंडचा विजयाचा फरक आणखी मोठा होण्यापासून रोखला गेला. १९६६ नंतर पहिल्या विश्वचषक विजेतेपदाच्या शोधात असलेल्या इंग्लंडसाठी हा विजय आत्मविश्वास वाढवणारा ठरला आहे. प्रशिक्षक थॉमस यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंडने विश्वचषक स्पर्धेत दमदार सुरुवात करत प्रतिस्पर्धी संघांना इशारा दिला आहे.

Comments
Add Comment

आयपीएल 2027 स्पर्धेत पुन्हा एकदा रोहित पर्व! मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावर परतण्याची तयारी, झालं असं..

आयपीएल स्पर्धेत पाच वेळा जेतेपदावर नाव कोरणाऱ्या मुंबई इंडियन्सची कामगिरी गेल्या काही वर्षात निराशाजनक राहिली

IND vs NZ 4th T20: न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात पराभव कुठे झाला? कर्णधार श्रेयस अय्यरने असं फोडलं खापर

भारताने सलग तीन सामन्यात न्यूझीलंडला त्यांच्याच भूमीत पराभवाची धूळ चारली होती. त्यामुळे चौथ्या टी20 सामन्यात

मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षक गटात मोठे बदल; पोलार्डच्या नेतृत्वाखाली दिग्गज खेळाडूंची नवीन इनिंग सुरू

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सने आपल्या प्रशिक्षक गटात मोठे आणि आश्चर्यकारक

IND vs NZ 4th T20: न्यूझीलंडने चौथ्या सामन्यात ऑकलंडचा इतिहास बदलला, भारताचा 87 धावांनी पराभव

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथ्या सामन्यात नाणेफेकीचा कौल

World Record: T20 मध्ये नवा इतिहास, दिग्गज गोलंदाजही मागे; राशिद खानचा क्रिकेट विश्वात नवा विक्रम

[caption id="attachment_1070550" align="aligncenter" width="800"] अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू रशीद खानने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक नवा

न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या टी20 सामन्यात श्रेयस अय्यरच्या नावावर अनोखा विक्रम, असं यापूर्वी कधीच घडलं नाही

[caption id="attachment_1070541" align="aligncenter" width="800"] न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत श्रेयस अय्यरचं नशिब जोरदार असल्याचं दिसत आहे. खरं तर