Bhiwandi : भिवंडीत शोरमा खाल्ल्याने अनेकांना विषबाधा, रुग्णालयात दाखल

भिवंडी : ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भिवंडीतील शांतीनगर परिसरात प्रसिद्ध असलेला 'फेमस शोरमा' आऊटलेटमध्ये विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांमुळे १०७ लोकांना अन्नविषबाधा झाल्याचे वृत्त आहे. विषबाधा झालेल्यांना भिवंडी उप-जिल्हा रुग्णालय येथे उपचारांसाठी दाखल केले आहे. वेळेत उपचार मिळाल्यामुळे सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.



प्रशासनाची मोठी कारवाई !

शोरमा विक्रेत्याकडील पदार्थांतून विषबाधा झाल्याचे उघड होताच प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. भिवंडी महानगरपालिकेने विक्रेत्याच्या बेकायदेशीर बांधकामाविरोधात पाडकामाची कारवाई सुरू केली आहे. शनिवारी घटनास्थळी बुलडोझर तैनात करण्यात आले आणि नागरी प्रशासनाने त्या आस्थापनेचे अनधिकृत भाग पाडण्यास सुरुवात केली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, आजूबाजूच्या परिसरातील इतर बेकायदेशीर बांधकामांवरही कारवाई केली जात आहे.



फेमस शोरमाचा मालक दिलशाद अन्सारीच्या विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुकानातील पदार्थांमध्ये चिकन शोरमा, पिझ्झा, फालुदा आणि इतर खाद्यपदार्थ खाल्यामुळे नागरिकांना त्रास झाल्याचं समोर आलं. दुकानाचा परवाना आणि नोंदणी मार्च २०२६ मध्येच संपली होती, तरीही व्यवसाय बेकायदेशीरपणे सुरू होता. प्रशासनाने कारवाई करून फेमस शोरमातील शेझवान चटणी, टोमॅटो डिप सॉस, मेयॉनीझ, चिकन मिक्स मसाला आणि पिझ्झा बेस यासह अनेक खाद्यपदार्थांचे नमुने गोळा करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. सुदैवाने विषबाधेमुळे जीवितहानी झालेली नाही मात्र बेजबाबदार व्यवसाय करणाऱ्या हॉटेल मालकावर कठोर कारवाई करण्यात येईल अशी शक्यता वर्तली जात आहे.
Comments
Add Comment

Hindi Exam : सरकारी कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा शिकण्याची सक्ती करणारा निर्णय रद्द

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालयामार्फत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात येणारी ‘हिंदी भाषा

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेत सप्टेंबरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यव्यापी शिबीर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे एक दिवसीय राज्यव्यापी शिबिर २७ सप्टेंबर रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आल्याची

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही

Lionel Messi : मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

अर्जेंटिना : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली