India vs Ireland : आयर्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाला दुहेरी धक्का! दोन प्रसिद्ध खेळाडू मालिकेबाहेर, इंग्लंड दौऱ्यावरही संकटाचे ढग

मुंबई : आयर्लंड दौऱ्याला सुरुवात होण्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा युवा अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डी दुखापतीमुळे आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या दुखापतीचे स्वरूप गंभीर असल्याने आगामी इंग्लंड दौऱ्यातील मर्यादित षटकांच्या मालिकेतही त्याच्या सहभागाबाबत साशंकता निर्माण झाली आहे. (India vs Ireland)


श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ २६ जूनपासून आयर्लंडविरुद्ध दोन सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. मात्र मालिकेपूर्वीच नितीश रेड्डीच्या दुखापतीने संघ व्यवस्थापनाची चिंता वाढवली आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, एमआरआय तपासणीत नितीशच्या डाव्या मांडीच्या स्नायूमध्ये सूज आढळून आली आहे. यानंतर त्याला पुढील तपासणी आणि उपचारांसाठी बंगळुरू येथील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये पाठवण्यात आले आहे. (India vs Ireland)



इंग्लंड दौऱ्यावरही प्रश्नचिन्ह :


नितीशची दुखापत अपेक्षेपेक्षा अधिक गंभीर असल्याचे समोर आले असून, त्यामुळे इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या टी-२० आणि वनडे मालिकेतही त्याचे खेळणे कठीण मानले जात आहे. आगामी महत्त्वाच्या दौऱ्यापूर्वी हा भारतीय संघासाठी मोठा धक्का मानला जात आहे. (India vs Ireland)



वरुण चक्रवर्तीही बाहेर :


नितीश रेड्डीनंतर आणखी एक वाईट बातमी म्हणजे फिरकीपटू वरुण चक्रवर्तीही आयर्लंड दौऱ्यावर जाणार नाही. आयपीएल 2026 दरम्यान त्याच्या डाव्या पायाला दुखापत झाली होती. सध्या तो बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये पुनर्वसन प्रक्रियेत असून पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी त्याला आणखी वेळ लागणार आहे. बीसीसीआयने खेळाडूंच्या फिटनेसबाबत कोणतीही जोखीम न घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यानंतरच या दोन्ही खेळाडूंना संघात पुनरागमनाची संधी दिली जाणार आहे. (India vs Ireland)



आयर्लंड दौरा का महत्त्वाचा?


आयर्लंडविरुद्धची मालिका भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. कारण त्यानंतर लगेचच इंग्लंडविरुद्ध पाच टी-२० आणि तीन वनडे सामन्यांची मोठी मालिका खेळायची आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापन प्रत्येक खेळाडूच्या फिटनेसवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. (India vs Ireland)



भारत-आयर्लंड टी-२० मालिकेचे वेळापत्रक :


पहिला टी-२०: २६ जून, स्टॉर्मोंट क्रिकेट ग्राऊंड, बेलफास्ट
दुसरा टी-२०: २८ जून, स्टॉर्मोंट क्रिकेट ग्राऊंड, बेलफास्ट (India vs Ireland)


आता नितीश रेड्डी किती लवकर तंदुरुस्त होतो आणि इंग्लंड दौऱ्यापूर्वी पुनरागमन करतो का, याकडे भारतीय क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.



आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी संभाव्य भारतीय संघ :


श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, तिलक वर्मा (उपकर्णधार), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, वैभव सूर्यवंशी आणि प्रसिद्ध कृष्णा. (India vs Ireland)

Comments
Add Comment

Tiwana Football Club : वांद्र्यातील नेव्हिल डि'सूजा फुटबॉल मैदानावर तिवाना संघाची बाजी

- मुंबई फुटबॉल असोसिएशन फर्स्ट डिव्हिजन २०२६ च्या चषकावर कोरले नाव मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई फुटबॉल

India vs Thailand Women T20 Asia Cup 2026 : भारताचा थायलंडवर ९४ धावांनी दणदणीत विजय; शेफाली वर्माची तुफानी खेळी

दुबई : महिला टी-२० आशिया कप २०२६च्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने थायलंडचा ९४ धावांनी पराभव

ENG vs PAK Test Match : लॉर्ड्सवर पाकिस्तानचा ‘काळा दिवस’; १९४ धावांत ऑलआऊट, WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर!

लॉर्ड्स : इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ३८९ धावांच्या

Kagiso Rabada : कागिसो रबाडा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सुरुवातीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.

Roger Federer : रॉजर फेडररचा 'टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश

नवी दिल्ली : ऱ्होड आयलंडमधील न्यूपोर्ट येथे 'इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश होताना २० वेळा ग्रँडस्लॅम

Dwayne Bravo No. 47 retired : ट्रिनबागो नाइट रायडर्सकडून ड्वेन ब्राव्होची ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त

नवी दिल्ली : ट्रिनबागो नाइट रायडर्स (टीकेआर) संघाने ड्वेन ब्राव्होची प्रतिष्ठित ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त