Footballer Alisha Lehmann : 'जगातील सर्वात ग्लॅमरस फुटबॉलपटू' लवकरच चढणार बोहल्यावर; बीचवरील रोमँटिक प्रपोजलचे फोटो व्हायरल

फुटबॉल विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय आणि ग्लॅमरस महिला खेळाडूंमध्ये गणली जाणारी स्वित्झर्लंडची स्टार फुटबॉलपटू अलिशा लेहमन (Footballer Alisha Lehmann) हिने आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. अलिशाने तिचा प्रियकर आणि रिअॅलिटी शो 'लव्ह आयलंड'चा स्टार मॉन्टेल मॅकेन्झी याचा लग्नाचा प्रस्ताव स्वीकारला असून लवकरच हे जोडपे विवाहबंधनात अडकणार आहे.


अलिशाने (Footballer Alisha Lehmann) सोशल मीडियावर तिच्या एंगेजमेंटचे काही खास फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी जाहीर केली. समुद्रकिनाऱ्यावर सूर्यास्ताच्या मनमोहक वातावरणात मॉन्टेलने तिला प्रपोज केले. या रोमँटिक क्षणाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून चाहत्यांकडून या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


27 वर्षीय अलिशा लेहमनने (Footballer Alisha Lehmann) इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या छायाचित्रांमध्ये मॉन्टेल मॅकेन्झी गुडघ्यावर बसून तिच्या बोटात अंगठी घालताना दिसत आहे. या खास क्षणी अलिशा भावूक झाल्याचेही फोटोंमधून स्पष्टपणे दिसून येते. फोटो शेअर करताना तिने "Forever and Always" असे कॅप्शन दिले आहे.



सूर्यास्ताच्या पार्श्वभूमीवर काळ्या रंगाच्या आकर्षक ड्रेसमध्ये अलिशा अत्यंत सुंदर दिसत होती. प्रपोजलनंतर दोघांनी एकमेकांना मिठी मारत आनंद साजरा केला. या रोमँटिक क्षणांनी चाहत्यांची मने जिंकली आहेत. (Footballer Alisha Lehmann)



यंदाच नात्याची केली होती घोषणा :


अलिशा लेहमन (Footballer Alisha Lehmann) आणि मॉन्टेल मॅकेन्झी यांनी यावर्षीच आपल्या नात्याची अधिकृत घोषणा केली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघांची पहिली भेट 'बॉलर्स लीग' स्पर्धेदरम्यान झाली होती. त्या वेळी अलिशा संघ व्यवस्थापकाच्या भूमिकेत होती, तर मॉन्टेल स्पर्धेत खेळाडू म्हणून सहभागी झाला होता. पहिल्याच भेटीत दोघांमध्ये चांगली मैत्री निर्माण झाली आणि कालांतराने हे नाते प्रेमात बदलले. जवळच्या सूत्रांच्या माहितीनुसार, काही महिन्यांतच दोघांनी एकत्र आयुष्य घालवण्याचा निर्णय घेतला. काही आठवड्यांपूर्वी हे जोडपे एका ज्वेलरी स्टोअरमध्ये दिसल्याने त्यांच्या साखरपुड्याच्या चर्चांना उधाण आले होते.



डग्लस लुईझसोबतही चर्चेत होते नाते :


मॉन्टेल मॅकेन्झीपूर्वी अलिशा लेहमनचे नाव ब्राझिलियन फुटबॉलपटू Douglas Luiz याच्यासोबत जोडले गेले होते. दोघे अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये होते आणि फुटबॉल विश्वातील चर्चित जोडप्यांपैकी एक मानले जात होते. 2024 मध्ये दोघेही Juventus FC शी संबंधित झाल्यानंतर त्यांच्या नात्याची अधिक चर्चा झाली होती. मात्र नंतर त्यांचे संबंध संपुष्टात आले. (Footballer Alisha Lehmann)



ब्रेकअपनंतर अलिशाने आपले संपूर्ण लक्ष फुटबॉल कारकीर्दीवर केंद्रित केले. मैदानावरील कामगिरीसोबतच सोशल मीडियावरही तिची लोकप्रियता सातत्याने वाढत गेली. आज तिचे कोट्यवधी चाहते असून ती जगातील सर्वाधिक फॉलो केल्या जाणाऱ्या महिला फुटबॉलपटूंमध्ये गणली जाते. खेळ, ग्लॅमर आणि सोशल मीडिया या तिन्ही क्षेत्रांमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी अलिशा आता आयुष्यातील नव्या प्रवासासाठी सज्ज झाली असून तिच्या विवाहाची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. (Footballer Alisha Lehmann)

Comments
Add Comment

आयपीएल 2027 स्पर्धेत पुन्हा एकदा रोहित पर्व! मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावर परतण्याची तयारी, झालं असं..

आयपीएल स्पर्धेत पाच वेळा जेतेपदावर नाव कोरणाऱ्या मुंबई इंडियन्सची कामगिरी गेल्या काही वर्षात निराशाजनक राहिली

IND vs NZ 4th T20: न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात पराभव कुठे झाला? कर्णधार श्रेयस अय्यरने असं फोडलं खापर

भारताने सलग तीन सामन्यात न्यूझीलंडला त्यांच्याच भूमीत पराभवाची धूळ चारली होती. त्यामुळे चौथ्या टी20 सामन्यात

मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षक गटात मोठे बदल; पोलार्डच्या नेतृत्वाखाली दिग्गज खेळाडूंची नवीन इनिंग सुरू

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सने आपल्या प्रशिक्षक गटात मोठे आणि आश्चर्यकारक

IND vs NZ 4th T20: न्यूझीलंडने चौथ्या सामन्यात ऑकलंडचा इतिहास बदलला, भारताचा 87 धावांनी पराभव

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथ्या सामन्यात नाणेफेकीचा कौल

World Record: T20 मध्ये नवा इतिहास, दिग्गज गोलंदाजही मागे; राशिद खानचा क्रिकेट विश्वात नवा विक्रम

[caption id="attachment_1070550" align="aligncenter" width="800"] अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू रशीद खानने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक नवा

न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या टी20 सामन्यात श्रेयस अय्यरच्या नावावर अनोखा विक्रम, असं यापूर्वी कधीच घडलं नाही

[caption id="attachment_1070541" align="aligncenter" width="800"] न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत श्रेयस अय्यरचं नशिब जोरदार असल्याचं दिसत आहे. खरं तर