Nitesh Rane : छत्रपती शिवाजी महाराज समान नागरी कायद्याचे जनक - मंत्री नितेश राणे

विशाळगडाला अतिक्रमण मुक्त करण्याबाबत केले आश्वस्त

मुंबई : "छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने समान नागरी कायद्याचे जनक होते. जे नियम हिंदूंना लागू होतात, तेच इतर धर्मांनाही लागू झाले पाहिजेत आणि हा समान नागरी कायदा राज्यात नक्की लागू होईल," असा विश्वास राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी शनिवारी व्यक्त केला आहे. सकल हिंदू समाज, शाहुवाडी-कोल्हापूर यांच्या वतीने श्री क्षेत्र विशाळगड येथे आयोजित भव्य शिवराज्याभिषेक सोहळ्यात शिवभक्तांना संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी विशाळगडावरील अनधिकृत अतिक्रमणांचा मुद्दा लावून धरत, गड लवकरच अतिक्रमण मुक्त केला जाईल, असे आश्वस्त केले.

विशाळगडाच्या पवित्र भूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा वैदिक मंत्रोच्चारात विधिवत राज्याभिषेक करण्यात आला. या सोहळ्यात बोलताना मंत्री नितेश राणे यांनी म्हणाले, "सेक्युलररिझमच्या नावाखाली जे जिहादी वळवळ करत आहेत, त्यांना वाटते शिवाजी महाराज फक्त त्यांनाच कळतात. शिवाजी महाराज सेक्युलर होते, असे म्हणणाऱ्यांनी आज हा सोहळा पाहावा," असे आव्हान त्यांनी दिले. तसेच, "शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याला आज विशाळगडावर एकही मुस्लिम का आला नाही? मूठभर भगवाधारींसाठी एवढा पोलीस बंदोबस्त का लावावा लागतो? हाच आमच्या आणि तुमच्या रक्तातील फरक आहे. आमचा बाप केवळ छत्रपती शिवाजी महाराज आहेत," असे ते म्हणाले.

विशाळगडावरील अतिक्रमणांबाबत बोलताना राणे म्हणाले, "मी गड चढत असतानाच या ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यांच्या नावांची यादी तयार करत होतो. सोमवारपासून यावर काय कारवाई होते ते सर्वांना दिसेल. मी काही 'व्हाइट कॉलर' मंत्री नाही; कार्यक्रम कसा करायचा, हे मला चांगल्या प्रकारे माहीत आहे," असा इशारा त्यांनी संबंधितांना दिला. विशाळगडाला अपेक्षित असलेली मुक्ती आमचे हिंदुत्ववादी सरकारच देईल. आम्ही कोणतीही तारीख सांगणार नाही, थेट योग्य वेळी बुलडोझर चालवून कारवाई करू. विशाळगडावर जो कोणी येईल, तो वाघजाई देवीच्या दर्शनासाठीच येईल", असे सांगत त्यांनी वाघजाई देवीच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराची संपूर्ण जबाबदारी स्वतः स्वीकारत असल्याचे जाहीर केले.
......
शिवभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शाहुवाडी येथील सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित या भव्य सोहळ्यात शिवभक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. राज्याभिषेक होत असताना प्रत्येक शिवभक्ताच्या मनात अभिमान, श्रद्धा आणि स्वराज्याप्रती निष्ठेची भावना दाटून आली होती. "जिथे जिथे भगवा फडकतो, तिथे तिथे शिवरायांचे विचार जिवंत राहतात," असे सांगत मंत्री राणे यांनी कट्टर हिंदू म्हणून निवडणूक लढवून हिंदू मतदारांच्या बळावरच आपण निवडून आल्याचे स्पष्ट केले.
Comments
Add Comment

Nanded Accident : सहस्त्रकुंड धबधबा पाहून परतताना काळाचा घाला; जीप झाडावर आदळली, 3 भाविकांचा मृत्यू

नांदेड : सहस्त्रकुंड धबधबा आणि महादेव मंदिराचे दर्शन घेऊन तेलंगणाकडे परतणाऱ्या भाविकांच्या जीपचा नांदेड

Pune Rain Alert : पुणेकरांनो, छत्री तयार ठेवा! पावसाचं पुन्हा आगमन; हवामान विभागाचा महत्त्वाचा अंदाज

पुणे : गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने पुणे शहरात उकाडा आणि दमटपणात वाढ झाली आहे. ढगाळ

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.