Mumbai News: मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा! पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील साठा ७.०८ टक्क्यांवर






मुंबई : मुंबईला (Mumbai) पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख तलावांतील पाणीसाठा अद्याप चिंताजनक स्थितीत असून शहरासमोरील पाणीपुरवठ्याचे आव्हान कायम आहे. जल अभियांत्रिकी विभागाच्या मास्टर कंट्रोल सेंटरने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळपर्यंत सर्व तलावांमध्ये मिळून केवळ ७.०८ टक्के वापरण्यायोग्य पाणीसाठा उपलब्ध आहे. सध्या एकूण १,०२,४६० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध असून तलावांची एकूण साठवण क्षमता १४,४७,३६३ दशलक्ष लिटर आहे. (Mumbai Water Supply)


अप्पर वैतरणा तलावाची परिस्थिती सर्वाधिक गंभीर आहे. या तलावाची पातळी लोअर डेड लेव्हलच्या खाली गेल्यामुळे त्यामध्ये वापरण्यायोग्य पाणीसाठा शिल्लक नाही. या भागात केवळ ८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.


मोडक सागरमध्ये काही प्रमाणात सुधारणा दिसून आली आहे. या तलावात १८.५० टक्के वापरण्यायोग्य पाणीसाठा असून परिसरात ६९ मिमी पाऊस झाला. तानसा तलावात १०१ मिमी पाऊस झाला असला तरी तेथे केवळ ०.४१ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.


मध्य वैतरणा तलावात ११.३६ टक्के वापरण्यायोग्य पाणी आहे. या परिसरात ७१ मिमी पावसाची नोंद झाली असून २३ जूनपासून येथून नियंत्रित पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे.


मुंबईला सर्वाधिक पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणातही केवळ ५.८५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. या भागात ८८ मिमी पाऊस झाला आहे.


वेहर आणि तुळसी या लहान तलावांमध्ये तुलनेने समाधानकारक स्थिती आहे. वेहरमध्ये ४४.८३ टक्के, तर तुळसीमध्ये २१.१२ टक्के वापरण्यायोग्य पाणी उपलब्ध आहे.


मागील वर्षांच्या तुलनेत यंदाचा एकत्रित पाणीसाठा कमी असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत मान्सूनचा जोर वाढणे आणि पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होणे मुंबईच्या पाणीपुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.







Comments
Add Comment

Devendra Fadnavis : सुट्या खाद्य तेलाच्या विक्रीस वर्षभराची मुदतवाढ; मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

पारंपरिक व्यावसायिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी समिती स्थापन करणार मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए)

Ashish Shelar : दहिसर 'ट्रान्सपोर्ट हब'च्या कामादरम्यान 'ब्लास्टिंग' नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करा!

- पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश; बाधित इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट, खनिज वाहतुकीची चौकशी करावी मुंबई : दहिसर

Devendra Fadnavis : मंत्री नितेश राणे, संग्राम जगताप, महेश लांडगे हे हिंदू नायक, त्यांनी पुढेही हिंदुत्वासाठीच काम केले पाहिजे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकोद्गार

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे, आमदार संग्राम जगताप आणि महेश लांडगे हे तिघेही हिंदू नायक असून

AndheriNews : वीरा देसाई रोड, जे.पी, रोड, आझाद नगरमधील आता तुंबणार पाण्यातून होणार सुटका

मोगरा नाल्यातील प्रवाह आता वळवणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) अंधेरी पश्चिम येथील वीरा देसाई रोड, जे.पी.रोड आणि आझाद

BMC : मोठ्या मंडळांसाठी समन्वय अधिकारी नेमा; समन्वय समितीची महापालिकेकडे मागणी!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत मोठ्याप्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात, अशा मंडळांसाठी महापालिकेने समन्वय

Malad Accident : "तिला मला शेवटचं पाहायचं आहे..."; जखमी पतीने व्हीलचेअरवरून घेतले पत्नीचे अखेरचे दर्शन

मुंबई : मालाडमध्ये रविवारी रात्री झालेल्या भीषण रस्ता अपघाताने एका कुटुंबावर मोठा आघात केला. या अपघातात ३४