अनंत अंबानींच्या भक्तीची भाविकांमध्ये चर्चा; रिलायन्स इंडस्ट्रीकडून तिरूपतीच्या बालाजी मंदिराला २७ कोटींची भेट !

तिरुपती : आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेल्या मुकेश अंबानी यांचे सुपुत्र आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे (Reliance Industries Limited) ​​कार्यकारी संचालक अनंत अंबानी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहेत. अनंत अंबानी यांनी रविवार, २८ जून रोजी तिरुमला येथील भगवान व्यंकटेश्वर (बालाजी) मंदिराला भेट दिली. त्यांनी सकाळच्या सुप्रभजन सेवेत भाग घेतला आणि आपली लांबलचक केशभूषा देवाच्या चरणी अर्पण केले. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीने देवाला आपले केस अर्पण करून आपल्या अहंकाराचा त्याग केला. याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.दर्शनानंतर मंदिरातील रंगनायकुला मंडपम येथे वैदिक विद्वानांनी अनंत अंबानी यांना 'वेदाशीर्वचनम्' देऊन आशीर्वाद दिला. तसेच तिरुमला तिरुपती देवस्थानमच्या (TTD) वतीने त्यांना श्रीवारी तीर्थप्रसाद आणि मानाची रेशमी शाल देऊन सन्मानित करण्यात आले.





मंदिराला २७ कोटींची भेट देणार !


या भक्तीमय प्रसंगी अनंत अंबानीने (Anant Ambani) तिरुपतीच्या देवस्थानासाठी एक मोठा घोषणा केली. रिलायन्सकडून देवसथानला सुमारे २७ कोटी रुपये किमतीच्या २५ आधूनिक इलेक्ट्रिक बस दान करण्यात येणार आहेत. या बसेस चालवण्यासाठी लागहणाऱ्या ५० ड्रायव्हर्सचा पगार आणि इतर सुविधाही कंपनी तर्फे केले जाणार आहे.याशिवाय तिरुमलामध्ये या बसेसच्या सुलभ वाहतुकीसाठी आवश्यक ईव्ही चार्जिंग स्टेशन्स (EV Charging Stations) उभारण्यासही त्यांनी पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे.



सोशल मिडीयावर चर्चांना उधाण


अनंत अंबानी यांचे लांब केस ही त्यांची ओळख होती, मात्र तिरुपतीमध्ये केसांचे त्याग करुन , आपली एक वेगळीच प्रतिम निर्माण केली आहे.भगवान श्रीकृष्ण आणि श्रीनाथजी यांच्यावर त्यांची अथांग श्रद्धा आहे. काही महिन्यांपूर्वीच आपल्या लग्नाआधी त्यांनी सर्व सुखसोयींचा त्याग करून द्वारकाधीश चरणी मैलोन्मैल पायी पदयात्रा केली होती. प्राण्यांवरील त्यांचे अपार प्रेम आणि त्यांच्या सेवेसाठी उभारलेले 'वनतारा' हे देखील त्यांच्या याच करुणामयी भक्तीचे रूप मानले जाते आहे.

Comments
Add Comment

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि