युरोपला उष्णतेचा तडाखा; फ्रान्समध्ये उष्माघातामुळे एक हजारपेक्षा जास्त मृत्यू ! आरोग्य यंत्रणा अलर्ट

फ्रान्स : युरोपमध्ये उष्णतेची लाट आली आहे. फ्रान्सच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 24 जूनपासून एक हजारापेक्षा जास्त मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. यापैकी 85 टक्के मृत्यू 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचे असून, सर्वाधिक फटका अतिउष्णता असलेल्या 'रेड अलर्ट' क्षेत्रांना बसला आहे.


अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पॅरिससह इल-द-फ्रान्स (Ile-de-France) परिसरात घरामध्ये होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण वाढले आहे. परिसरात अनेक ज्येष्ठ नागरिक घरी एकटे असल्याने त्यांना वेळेवर मदत मिळू शकली नाही. यामुळे प्रशासनाने नागरिकांना एकाकी आणि वृद्ध व्यक्तींची विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, पॅरिसमधील रुग्णालयांवरही प्रचंड ताण निर्माण झाला आहे. सलग दुसऱ्या दिवशी 3,000 नागरिकांनी आपत्कालीन विभागाकडे उपचारासाठी धाव घेतली आहे, जे नेहमीपेक्षा जवळपास अधिक आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे पॅरिस सार्वजनिक रुग्णालय प्रशासनाने (AP-HP) आपल्या सर्व 38 रुग्णालयांमध्ये आपत्कालीन योजना लागू केली आहे. वैद्यकीय हेल्पलाईनवर येणाऱ्या फोन कॉल्समध्येही गेल्या वर्षाच्या तुलनेत 80 टक्क्यांनी वाढ झाली आहे.



फ्रान्सपुरतीच ही परिस्थिती मर्यादित नसून संपूर्ण पश्चिम आणि मध्य युरोप उष्णतेच्या लाटेने होरपळत आहे. डेन्मार्कमध्ये 1874 नंतर प्रथमच 37 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर स्वित्झर्लंडमधील बाझेल येथे 38.8 अंश सेल्सिअस तापमानाचा विक्रम झाला. जर्मनीतही तापमान 40 अंशांच्या जवळ पोहोचल्याने उष्णतेमुळे ऑटोबान महामार्गावरील काँक्रीट तडकले आणि काही मार्ग वाहतुकीसाठी बंद करावे लागले. फ्रान्सच्या आरोग्य विभागाने सांगितले की, हे आकडे प्राथमिक असून मृत्यूंची संख्या आणखी वाढू शकते. रविवारी काही भागांत तापमानात किंचित घट झाली असली तरी, अनेक शहरांमध्ये गेल्या काही दिवसांत 40 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान नोंदवले गेले असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे

Comments
Add Comment

पाकिस्तानमध्ये शाळेचे छत कोसळून भीषण दुर्घटना, 20 विद्यार्थ्यांसह 21 जणांचा मृत्यू

पेशावर : पाकिस्तानमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पेशावरमधील दिर कॉलनी परिसरात एका खासगी शाळेचे छत

Crime News: अमेरिकेत हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबाराचा कट उधळला; 19 वर्षीय तरुणाला अटक

अमेरिका : अमेरिकेतील शिकागो परिसरात हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबार करण्याचा कथित कट उधळण्यात आला आहे. या

इस्रायलचे नवे कठोर नियम, 31 देशांतील क्रू सदस्यांच्या प्रवेशावर निर्बंध; एअर फ्रान्सकडून पालनाला दुजोरा

तेलअवीव : फ्लाय दुबईच्या विमानाशी संबंधित अपहरणाच्या प्रयत्नानंतर इस्रायलने परदेशी विमान कंपन्यांसाठी

Germany Robot Viral Video : रोबोटकडून १६ वर्षांच्या तरुणीचा लैंगिक छळ; जर्मनीत खळबळ, पोलिसांनी रोबोटसह मोबाईल केले जप्त

कोलोन : जर्मनीतील कोलोन शहरात एका रेस्टॉरंटबाहेर १६ वर्षांच्या अल्पवयीन तरुणीचा रोबोटद्वारे अयोग्य स्पर्श आणि

विमान अपहरणाचा प्रयत्न? UAE मध्ये मालदीवचे 2 वैमानिक अटकेत; नेमकं प्रकरण काय?

अबुधाबी : दुबईहून तेल अवीवच्या दिशेने जाणाऱ्या 'फ्लाय दुबई' (Flydubai) विमानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एक मोठी आणि

धक्कादायक! फ्रान्समधील सुपरमार्केटच्या शेकडो फ्रिजवर सायबर हल्ला; अन्नाचा साठा गरम झाल्याने लाखो युरोंचे नुकसान

पॅरिस : फ्रान्समधील सुपरमार्केटवर झालेल्या एका अजब आणि भीषण सायबर हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामुळे