India Seychelles Relations : सेशेल्स दौऱ्यात भारताचे मोठे पाऊल; १९ करारांवर स्वाक्षऱ्या, संरक्षण ते UPI पर्यंत सहकार्याला चालना

सेशेल्स : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सेशेल्स दौऱ्यात भारत (India) आणि सेशेल्स (Seychelles) यांच्यातील संबंध अधिक मजबूत करण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी (President Patrick Herminie) यांच्यासोबत झालेल्या शिष्टमंडळ स्तरावरील बैठकीत संरक्षण, सागरी सुरक्षा, आरोग्य, डिजिटल पेमेंट, शिक्षण, कृषी आणि अंतराळ क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यावर चर्चा झाली. या दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये एकूण १९ करार आणि विविध उपक्रमांची घोषणा करण्यात आली.


बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंद महासागर हा भारत आणि सेशेल्सचा समान वारसा असल्याचे सांगितले. या क्षेत्राची सुरक्षा, स्थिरता आणि विकास ही दोन्ही देशांची संयुक्त जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. भारताचा उद्देश हिंद महासागराला संधी आणि विकासाचा महासागर बनवण्याचा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (PM Narendra Modi)



भारत-सेशेल्स १९ करारांवर स्वाक्षरी


या भेटीदरम्यान संरक्षण आणि सागरी सुरक्षेला विशेष महत्त्व देण्यात आले. दोन्ही देशांनी चाचेगिरी, अमली पदार्थांची तस्करी, अवैध मासेमारी आणि सीमापार गुन्हेगारी रोखण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.


भारताने सेशेल्सला एक वेगवान गस्ती जहाज, १० उपयुक्त वाहने, ५ लेझर रेडियल बोटी, ६ रुग्णवाहिका, ५०० मेट्रिक टन तांदूळ आणि ८,५०० मेट्रिक टन सिमेंट भेट देण्याची घोषणा केली. तसेच सेशेल्स तटरक्षक दलाच्या एका जहाजाची दुरुस्ती आणि डॉर्नियर विमानाच्या आधुनिकीकरणाचे काम पूर्ण झाल्याची माहितीही देण्यात आली.



डिजिटल पेमेंट करण्यासंदर्भात सामंजस्य करार


डिजिटल क्षेत्रातही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. भारतातील UPI आधारित डिजिटल पेमेंट (Digital Payment) प्रणाली सेशेल्समध्ये सुरू करण्यासाठी संबंधित संस्थांमध्ये सामंजस्य करार करण्यात आला. याशिवाय जन औषधी योजनेअंतर्गत भारतीय औषधे उपलब्ध करून देण्यासाठीही स्वतंत्र करार करण्यात आला.



सेशेल्सच्या स्वातंत्र्याला ५० वर्षे आणि भारत-सेशेल्स राजनैतिक संबंधांना ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विशेष स्मृतिचिन्ह लोगोचेही अनावरण करण्यात आले. पंतप्रधान मोदी या दौऱ्यात सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमालाही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.


Comments
Add Comment

Tamil nadu crime news : तमिळनाडू हादरले! पाण्याच्या टाकीत आढळले महिलेचे छिन्नविच्छिन्न अवशेष; दागिन्यांच्या चोरीसाठी हत्येचा संशय

सेलम : तमिळनाडूतील सेलम (Taamilnadu Crime News) जिल्ह्यात एक अत्यंत भयानक आणि मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. घराच्या छतावर

IndiGo Emergency Landing : गोवा-दिल्ली इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग; इंजिनमध्ये बिघाड झाल्याने २२९ प्रवाशांचा जीव टांगणीला

गोवा : गोव्याहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो (IndiGo) एयरलाइन्सच्या विमानाचे मंगळवारी सकाळी गोवा विमानतळावर तातडीने

Nepal green house miracle : नेपाळमधील महापुरात सर्वकाही वाहून गेले; पण ४० वर्षे जुने 'हिरवे घर' कसे टिकून राहिले ? घरमालकाने सांगितली आपवीती

काठमांडू : "जेव्हा तुम्हाला वाटतं की हे तुमच्या आयुष्याचे शेवटचे क्षण आहेत, तेव्हा डोक्यात काय विचार येऊ शकतात?

Gold Silver Rate Today : PM मोदींचे 'ते' आवाहन अन् सोन्या-चांदीचे भाव गडगडले! चांदी थेट 'इतक्या' हजारांनी स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

मुंबई : परदेशी चलनावरील वाढता दबाव कमी करण्यासाठी आणि देशांतर्गत बाजारपेठेत संतुलन राखण्यासाठी पंतप्रधान

Uzbekistan 30 Days Visa Free Entry : भारतीय पर्यटकांसाठी मोठी खुशखबर! उझबेकिस्तानमध्ये ३० दिवस व्हिसामुक्त प्रवास

नवी दिल्ली : परदेशात फिरण्याचा प्लॅन करणाऱ्या भारतीय पर्यटकांसाठी मोठी खुशखबर आहे. उझबेकिस्तानने भारतीय

PM Selfie Video : भारताचा विकास दर ७.८%; पंतप्रधान मोदींकडून नागरिकांचे अभिनंदन, म्हणाले- ‘ही आपल्या सामूहिक शक्तीची ओळख’

नवी दिल्ली : भारताने आर्थिक विकासाच्या बाबतीत दमदार कामगिरी करत आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीत ७.८ टक्के