DCM Eknath Shinde : 'महाराष्ट्रात गुन्हेगारांना अभय नाही'; नसरापूर प्रकरणाच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा कडक इशारा

- महिला व बालिकांवरील अत्याचारांबाबत सरकारची शून्य सहनशीलतेची भूमिका


मुंबई : नसरापूर बालिका बलात्कार आणि हत्या प्रकरणात न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी या निर्णयाचे स्वागत करत महाराष्ट्रात कायद्याचे राज्य असून गुन्हेगारांना कोणतेही अभय मिळणार नसल्याचा स्पष्ट इशारा दिला. विधिमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हा निर्णय न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ करणारा असल्याचे सांगितले.


उपमुख्यमंत्री शिंदे (DCM Eknath Shinde) म्हणाले की, न्यायालयाच्या या निकालामुळे पीडित कुटुंबाला न्याय मिळाल्याची भावना निर्माण झाली आहे. महिलांवर आणि बालिकांवर अत्याचार करणाऱ्यांसाठी हा कठोर आणि स्पष्ट संदेश असून, अशा घृणास्पद गुन्ह्यांना महाराष्ट्रात कोणतीही माफी नाही.



"अशा नराधमांना समाजात किंवा कायद्याच्या राज्यात स्थान नाही. महिलांवर, मुलींवर आणि लहान बालिकांवर अत्याचार करणाऱ्यांना कायद्याच्या चौकटीत राहून कठोरात कठोर शिक्षा व्हायलाच हवी," असेही शिंदे यांनी ठामपणे सांगितले. ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. प्रत्येक महिला आणि मुलगी सुरक्षित वातावरणात जगू शकेल, यासाठी सरकार सातत्याने प्रभावी उपाययोजना राबवत आहे. (DCM Eknath Shinde)


गुन्ह्यांचा जलद तपास, फास्ट ट्रॅक न्यायालयांमार्फत खटल्यांचा वेगाने निपटारा आणि दोषींना कठोर शिक्षा मिळावी यासाठी राज्य सरकार पूर्णपणे कटिबद्ध असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली. (DCM Eknath Shinde)



नसरापूर प्रकरणातील न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्यात कायद्याचा धाक कायम असल्याचा संदेश गेला असून, महिलांविरोधातील गुन्ह्यांबाबत सरकारची 'शून्य सहनशीलता' धोरण कायम राहील, असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. (DCM Eknath Shinde)




Comments
Add Comment

MahaBhumi Stack : आता एका क्लिकवर मिळणार जमीन सर्च रिपोर्ट! महाराष्ट्रात महाभूमी स्टॅकचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील जमीन व्यवहार अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी महसूल व वन विभागाने ‘महाभूमी स्टॅक’ ही

Dr Sampada Munde Case : डॉ. संपदा मुंडे आत्महत्येप्रकरणी छाननी समिती स्थापन

मुंबई : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात

Maharashtra Weather Update : सप्टेंबरच्या सुरुवातीलाच हवामान बदलणार; विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

मुंबई : महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात पावसाने काहीशी ओढ दिल्यानंतर सप्टेंबरच्या सुरुवातीला हवामानात बदल

Jalgaon : काल वाढदिवस...आज काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश, चिमुकल्याला झोळीत गळफास

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे अत्यंत धक्कादायक अन् हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पहिल्या वाढदिवस ,

Medha Kulkarani : धार्मिक उत्सवात अशा कार्यक्रमांची गरज काय...; गणेशोत्सवात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरून वाद

पुणे : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि श्रद्धेने साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाला राज्यभरात सुरुवात झाली आहे.

Nanded Accident : सहस्त्रकुंड धबधबा पाहून परतताना काळाचा घाला; जीप झाडावर आदळली, 3 भाविकांचा मृत्यू

नांदेड : सहस्त्रकुंड धबधबा आणि महादेव मंदिराचे दर्शन घेऊन तेलंगणाकडे परतणाऱ्या भाविकांच्या जीपचा नांदेड