Rajya Sabha : राज्यसभेच्या आठ नवनिर्वाचित सदस्यांनी घेतली शपथ

नवी दिल्ली : राज्यसभेचे अध्यक्ष सी. पी. राधाकृष्णन(CP Radhkrushna) यांनी सोमवारी राज्यसभेच्या सात नवनिर्वाचित आणि पुनर्निर्वाचित सदस्यांना पदाची शपथ दिली.


शपथ घेतलेल्या सदस्यांमध्ये मानसिंग मेरामन परमार, तरुण चुघ, डॉ. अलका सिंह, जितेंद्र मेघजीभाई कंजारिया, राजेंद्र हिरालाल जैन, एम. नागराजा आणि अधिकारिमायुम शारदा देवी यांचा समावेश आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही सोमवारी राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. ते सलग दुसऱ्यांदा कर्नाटकातून राज्यसभेचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत.



यापैकी पाच सदस्यांनी हिंदीत, एकाने कन्नडमध्ये, एकाने पंजाबीमध्ये आणि एकाने मणिपुरीमध्ये शपथ घेतली. यापैकी दोन सदस्य गुजरातचे, तर प्रत्येकी एक सदस्य कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर आणि राजस्थानचे प्रतिनिधित्व करतो.


राज्यसभेचे उपसभापती हरिवंश, सभागृह नेते आणि केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू, कायदा आणि न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, राज्यसभा सदस्य जयराम रमेश आणि प्रफुल्ल पटेल, राज्यसभा महासचिव पी.सी. मोदी आणि सचिवालयाचे इतर वरिष्ठ अधिकारीही याप्रसंगी उपस्थित होते.

Comments
Add Comment

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि