Presidential Award : ऑपरेशन सिंदूर”सह विविध मोहिमांतील वीरांना सन्मान

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सोमवारी राष्ट्रपती भवनात आयोजित संरक्षण अलंकरण समारंभात देशातील शूर जवानांचा गौरव करण्यात आला. या सोहळ्यात 7 कीर्ती चक्र, 15 वीर चक्र आणि 29 शौर्य चक्र प्रदान करण्यात आले.या समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी(narendra modi) आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते.


देशभरातील शौर्याचा सन्मान


या समारंभातून भारतीय सैन्य, हवाई दल आणि पोलिस दलातील जवानांच्या अतुलनीय धैर्याला राष्ट्राने सलाम केला. विविध मोहिमांतील त्यांच्या कामगिरीमुळे देशाच्या सुरक्षेला मोठा हातभार लागल्याचे या सन्मानातून अधोरेखित झाले. यावेळी ऑपरेशन सिंदूरमधील शौर्याला वीर चक्र


या सन्मानांमध्ये भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन मनीष अरोरा यांना वीर चक्र प्रदान करण्यात आले. “ऑपरेशन सिंदूर”(opretion sindoor) दरम्यान त्यांनी सुखोई-30 एमकेआय विमानातून पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर झालेल्या हवाई कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली होती. यापूर्वीही त्यांच्या सेवेला मान्यता मिळाली असून त्यांना शौर्य चक्र प्रदान करण्यात आले होते.



सीमाभागातील कारवाईत पराक्रम


लोकेशन ऑफ कंट्रोल (LOC) परिसरात तीन दहशतवाद्यांना ठार करणाऱ्या लेफ्टनंट कर्नल नितेश भारती शुक्ला यांनाही वीर चक्र देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच, अरुणाचल प्रदेशातील सीमावर्ती भागात झालेल्या लष्करी मोहिमेत शौर्य दाखवणाऱ्या मेजर आदित्य प्रताप सिंह यांना शौर्य चक्र प्रदान करण्यात आले.


नक्षलविरोधी मोहिमेत पोलिसांचे धैर्य


छत्तीसगडमध्ये झालेल्या नक्षलविरोधी कारवाईत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या इन्स्पेक्टर लक्ष्मण केवट आणि इन्स्पेक्टर रामेश्वर प्रसाद देशमुख यांनाही शौर्य चक्र देण्यात आले.दोन्ही अधिकाऱ्यांनी 16 एप्रिल 2024 रोजी झालेल्या चकमकीत नेतृत्व करत जखमी जवानांचे प्राण वाचवत मोहीम यशस्वी केली होती.


मरणोत्तर कीर्ती चक्र


शिपाई जंजाल प्रवीण प्रभाकर यांना मरणोत्तर कीर्ती चक्र प्रदान करण्यात आले. जुलै 2024 मध्ये जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत त्यांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा करत वीरमरण पत्करले.त्यांच्या आईने पुरस्कार स्वीकारताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भावनिक आलिंगन दिले, ज्यामुळे संपूर्ण सभागृह भावुक झाले.

Comments
Add Comment

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि

Dr. Koyyala Ruth John Paul: संघर्षातून यशाकडे! भारतातील तृतीयपंथीयांचा वैद्यकीय क्षेत्रात नवा इतिहास

मुंबई: तृतीयपंथातील अनेक व्यक्तींना आजही सामाजिक भेदभाव, शिक्षणातील अडचणी, रोजगाराच्या मर्यादित संधी आणि

Global Handwashing Day 2026 : हातांच्या स्वच्छतेबाबत आयुर्वेद काय सांगतो ? जाणून घ्या रोजच्या आरोग्याची गुरुकिल्ली!

आपण आपलं आरोग्य उत्तम राहावं म्हणून रोजच्या आयुष्यात अनेक छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घेतो. पण यातली सर्वात

NHRC Internship 2026: विद्यार्थ्यांसाठी खास संधी! राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून इंटर्नशिप कार्यक्रम जाहीर; कसा कराल अर्ज?

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) आपल्या हिवाळी इंटर्नशिप प्रोग्रॅम २०२६ साठी अर्ज मागवले आहेत. ही इंटर्नशिप चार

एअर इंडियाच्या विमानाचे जयपूर येथे आपत्कालीन लँडिंग; नेमकं काय घडलं?

जर्मनीच्या फ्रेंकफर्ट येथून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे जयपूर एयरपोर्टवर आपत्कालीन लँडिंग

Bihar Boat Accident : बिहारमध्ये गंगा नदीत प्रवाशांनी भरलेली बोट उलटली; 13 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती

बिहार : बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील हाजीपूरजवळ गंगा नदीत प्रवाशांनी भरलेली बोट उलटल्याची दुर्घटना घडली आहे.