Thailand Job Scam News: प्लिज..! आम्हाला वाचवा; थायलंडमध्ये अडकलेल्या तरुणांचे बेहाल, नेमकं काय प्रकरण?

महाराष्ट्रातील ३० जण गोल्डन ट्रँगलच्या जाळ्यात?


परदेशात चांगल्या पगाराची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून बीडमधील (Beed) एका तरुणाला म्यानमार-थायलंड सीमेवरील कथित सायबर फसवणूक रॅकेटमध्ये (Cyber Fraud) अडकवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या तरुणासह महाराष्ट्रातील २५ ते ३० जण आणि देशभरातील शेकडो तरुण अशाच प्रकारे फसल्याचा दावा करण्यात आला आहे. (Thailand Job Scam News)


बीड जिल्ह्यातील नांदुरघाट येथील स्वप्निल काळुंके हा ग्राफिक डिझायनर असून त्याने सोशल मीडियावर परदेशातील नोकरीची जाहिरात पाहिली होती. जाहिरातीत दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर त्याला महिन्याला ७० हजार रुपये पगाराचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर ४ जून रोजी तो पुण्यावरून बँकॉकला रवाना झाला.



स्वप्निलने कुटुंबीयांना व्हॉट्सअॅप कॉलद्वारे दिलेल्या माहितीनुसार, बँकॉकमध्ये पोहोचल्यानंतर त्याचा पासपोर्ट हिसकावून घेण्यात आला आणि त्याला म्यानमारच्या सीमेवरील भागात नेण्यात आले. तेथे ऑनलाइन फसवणुकीशी संबंधित काम करण्यास भाग पाडले जात असल्याचा त्याचा आरोप आहे. काम करण्यास नकार दिल्यास मारहाण आणि छळ केला जात असल्याचाही दावा त्याने केला आहे.


स्वप्निलने आपल्या कुटुंबीयांना सावध राहण्यास सांगितले असून, त्याच्यासोबत महाराष्ट्रातील अनेक तरुण अडकल्याचेही सांगितले आहे. तसेच देशभरातील सुमारे ७०० ते ८०० जण या जाळ्यात अडकल्याचा दावा त्याने केला आहे. या दाव्यांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. आम्ही पूर्णपणे अडकले आहोत आमची येथून सुटका करा अशी विनंती तरुणाने आपल्या कुटुंबियांना केली आहे.



या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर बीड सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच ही बाब राज्य पोलिस, परराष्ट्र मंत्रालय आणि म्यानमारमधील भारतीय दूतावासाच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. संबंधित तरुणांची सुटका करण्यासाठी आवश्यक पावले उचलली जात असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.


Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा