TDCC Bank Election : ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत 'सहकार पॅनल'ची सरशी; शिंदे-चव्हाण यांच्या रणनीतीला यश, महायुतीचे १३ उमेदवार विजयी

- बहुजन विकास आघाडीच्या वर्चस्वाला धक्का, बँकेच्या सत्तेवर महायुतीची पकड मजबूत


मुंबई : ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत (TDCC Bank Election) 'सहकार पॅनल'ने 'परिवर्तन पॅनल'वर मात करत निर्णायक विजय मिळवला आहे. या निवडणुकीत महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजपचे उमेदवार दोन्ही पॅनलमधून रिंगणात उतरल्याने ही निवडणूक विशेष चर्चेची ठरली. अखेरीस 'सहकार पॅनल'ला बहुमत मिळाल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप नेते रविंद्र चव्हाण यांच्या रणनीतीला यश मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. (TDCC Bank Election)


ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर अनेक वर्षांपासून हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व राहिले आहे. मात्र, यावेळी बँकेची सत्ता मिळवण्यासाठी महायुतीने वेगळी रणनीती आखली होती. 'सहकार पॅनल'मध्ये शिवसेना आणि भाजपचे उमेदवार एकत्र लढले, तर दुसऱ्या बाजूला 'परिवर्तन पॅनल'मध्येही दोन्ही पक्षांतील काही उमेदवार निवडणुकीच्या मैदानात होते. दोन्ही गटांमध्ये उमेदवार उभे करण्यामागे स्थानिक राजकीय समीकरणे आणि इच्छुकांची संख्या हे प्रमुख कारण असल्याचे सांगण्यात आले होते. (TDCC Bank Election)



एकूण २१ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत बहुमतासाठी ११ जागांची आवश्यकता होती. निकालात भाजपचे ८ आणि शिवसेनेचे ५ असे महायुतीचे एकूण १३ उमेदवार विजयी झाले. त्यामुळे बँकेवरील सत्ता मिळवण्यासाठी आवश्यक असलेले स्पष्ट बहुमत महायुतीच्या बाजूने गेल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. या निकालामुळे ठाणे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील बहुजन विकास आघाडीच्या दीर्घकालीन वर्चस्वाला धक्का बसल्याचे मानले जात आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदे आणि रविंद्र चव्हाण यांनी आखलेल्या निवडणूक रणनीतीचीही राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. (TDCC Bank Election)



दरम्यान, बँकेच्या संचालक मंडळाची पुढील रचना आणि पदाधिकाऱ्यांची निवड याबाबतचा अंतिम निर्णय महायुतीच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीचे वरिष्ठ नेते याबाबत पुढील भूमिका निश्चित करतील, अशी राजकीय चर्चा सुरू आहे. (TDCC Bank Election)

Comments
Add Comment

Nitesh Rane : 'मोदी एक्सप्रेस'च्या तारखेत बदल

- कोकणवासीयांच्या मागणीनुसार गणपती स्पेशल ट्रेन आता ११ व १३ सप्टेंबरला धावणार; मंत्री नितेश राणे यांची

Mumbai News : मुंबईतील जगजीवन राम रुग्णालयाच्या रक्तपेढीचा परवाना दोन दिवसांसाठी निलंबित

मुंबई : रक्तदानाच्या नोंदींमधील त्रुटी, अपुरे दस्तऐवजीकरण आणि विहित क

Nitesh Rane : सिंधुदुर्गात कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी प्रभावी कार्यवाहीचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांची माहिती

कुक्कुटपालनाला 'कृषी समकक्ष' दर्जा दिल्याने युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात

Shri Ganesha Aarogyacha : श्रीगणेशोत्सवात मुंबईतील सार्वजनिक श्रीगणेश मंडळांच्या सभा मंडपात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रम राबविणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : यंदाच्या श्रीगणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी

Nitesh Rane : मालेगावमध्ये आधुनिक मासळी बाजार उभारणीला गती

- सांगलीतील प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : वाशिम जिल्ह्यातील

Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचा उद्या निकाल

- आदित्य ठाकरे प्रतिवादी; मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष मुंबई : दिशा सालियन