Haldia Refinery Fire : हल्दिया रिफायनरीच्या पाइपलाइनला आग; १५ कर्मचारी जखमी, रेल्वे सेवेवरही परिणाम

कोलकाता : पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील हल्दिया पेट्रोकेमिकल्सच्या नॅफ्था पुरवठा पाइपलाइनला मंगळवारी पहाटे भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेदरम्यान आगीच्या विळख्यात सापडल्याने 15 जण होरपळले असून सर्व जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच, या आगीत अनेक घरेही जळून खाक झाली. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल करण्यात आल्या आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे सुमारे चारच्या सुमारास हल्दिया पेट्रोकेमिकल्सच्या नॅफ्था पाइपलाइनमध्ये अचानक जोरदार स्फोट झाला. स्फोटानंतर आग वेगाने पसरत हल्दिया नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 13 मधील चिरंजीबपूर परिसरापर्यंत पोहोचली. अचानक झालेल्या या स्फोटामुळे आणि आगीच्या प्रचंड ज्वाळांमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. घाबरलेल्या नागरिकांनी आपली घरे सोडून सुरक्षित ठिकाणी धाव घेतली.



स्थानिक रहिवाशांनी सांगितले की, पहाटे अचानक पाइपलाइनमधून मोठा स्फोटाचा आवाज आला. त्यानंतर काही मिनिटांतच परिसरातील अनेक घरांना आग लागली आणि संपूर्ण भाग आगीच्या विळख्यात सापडला. अग्निशमन दलाच्या १२ गाड्या आग आटोक्यात आणण्यासाठी घटनास्थळी तैनात करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आग विझवण्याचे काम अद्याप सुरू आहे.अग्निशमन दल आणि बचाव पथकाने गंभीर भाजलेल्या 15 जणांना बाहेर काढून तातडीने हल्दिया उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यापैकी पाच जणांना पुढील उपचारांसाठी तमलुक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, दोघांची प्रकृती गंभीर आहे.


घटनेची माहिती मिळताच हल्दियाचे आमदार प्रदीप बिजली (praddep bijali)यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. त्यांनी प्राथमिक अंदाज व्यक्त करताना नॅफ्था गॅसच्या गळतीमुळे पाइपलाइनमध्ये स्फोट होऊन आग लागल्याची शक्यता वर्तवली. मात्र, गॅसची गळती नेमकी कशामुळे झाली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.



दरम्यान, हल्दिया पेट्रोकेमिकल्सच्या व्यवस्थापनाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात या दुर्घटनेच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आल्याचे सांगितले आहे. कर्मचारी आणि प्रभावित नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करणे हीच सध्या कंपनीची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचेही व्यवस्थापनाने स्पष्ट केले.


या दुर्घटनेचा परिणाम रेल्वे वाहतुकीवरही झाला आहे. ज्या पाइपलाइनमध्ये स्फोट झाला, त्याच्याजवळून हल्दिया–पांशकुडा रेल्वेमार्ग जातो. स्फोटामुळे रेल्वेच्या ओव्हरहेड वीजवाहिन्या आणि ट्रान्सफॉर्मर जळून खाक झाले असून, रेल्वे रुळांचाही काही भाग नुकसानग्रस्त झाला आहे.सुरक्षेच्या कारणास्तव हल्दियाहून हावड्याकडे जाणारी प्रवासी रेल्वे थांबविण्यात आली असून, त्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. या भीषण औद्योगिक दुर्घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, प्रशासनाने घटनेचा सखोल तपास सुरू केला आहे.

Comments
Add Comment

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि