Delhi Police : दिल्लीत मोठ्या हल्ल्याचा कट उधळला, आयएसआयशी संबंधित ४ दहशतवाद्यांना अटक

नवी दिल्ली : एका मोठ्या आंतरराज्यीय कारवाईत, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने पाकिस्तानची(Pakistan) गुप्तचर संस्था आयएसआयच्या पाठिंब्याने चालणाऱ्या दहशतवादी आणि शस्त्र तस्करीच्या नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे या प्रकरणात, पोलिसांनी पंजाब आणि दिल्लीतील चार दहशतवाद्यांना अटक केली आहे. जे एका पाकिस्तानी हँडलरच्या सांगण्यावरून राजधानीवर हल्ला करण्याचा कट रचत होते. अटक केलेल्या दहशतवाद्यांकडून तुर्की बनावटीच्या झिगाना पिस्तुलासह दोन परदेशी बनावटीची पिस्तूलं, नऊ काडतुसे आणि पाच मोबाईल फोन जप्त करण्यात आले.



स्पेशल सेलचे डीसीपी प्रवीण कुमार त्रिपाठी(DCP Pravin Kumar Tripathi ) यांच्या म्हणण्यानुसार, एसीपी विवेक कुमार त्यागी, इन्स्पेक्टर सतीश राणा आणि इन्स्पेक्टर अशोक यांच्या पथकाला तांत्रिक आणि गुप्त माहिती मिळाली होती की, पाकिस्तानस्थित आयएसआयचा हँडलर शहजाद भट्टी आपल्या साथीदारांसह दिल्ली एनसीआरमध्ये एक मोठा दहशतवादी हल्ला करण्याची योजना आखत होता. त्याने पंजाबमधील स्थानिक तरुणांना आपल्या जाळ्यात ओढले होते.


प्राथमिक तपासानंतर, विशेष पथकाने भारतीय दंड संहिता आणि शस्त्र कायद्याच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. त्यानंतर, दिल्ली आणि पंजाबमधील अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले. सर्वप्रथम, शुभदीप सिंग उर्फ विशला पंजाबमधून अटक करण्यात आली.


त्याच्याकडून एक सेमी-ऑटोमॅटिक पिस्तूल, पाच काडतुसे आणि दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले. चौकशीदरम्यान, त्याने शहजाद भट्टी नेटवर्कच्या पाकिस्तानी हँडलर्सच्या थेट संपर्कात असल्याची आणि ड्रोनद्वारे शस्त्रे व अमली पदार्थांची खेप स्वीकारत असल्याची कबुली दिली.



शुभदीपकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, त्याचे दोन साथीदार, गुरजंत सिंग उर्फ ऋषी आणि साजन सिंग उर्फ हनी यांना पंजाबमध्ये(Panjab) अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एक 'जिगाना पिस्तूल' आणि चार काडतुसे जप्त करण्यात आली. पुढील कारवाईत, पोलिसांनी गगनप्रीत नावाच्या चौथ्या दहशतवाद्याला दिल्लीतून अटक केली. त्याच्या मोबाईल फोनमधून अनेक गुन्हेगारी पुरावे जप्त करण्यात आले.


अटक केलेल्या आरोपींपैकी, गगनप्रीतला त्याच्या पाकिस्तानी सूत्रधारांकडून एक अत्यंत धोकादायक काम सोपवण्यात आले होते. तो दिल्लीतील पोलीस ठाणी, पोलीस चौक्या आणि प्रमुख धार्मिक स्थळांची टेहळणी करून त्याचे चित्रीकरण करत होता आणि ते पाकिस्तानला पाठवत होता. त्याला दिल्लीतील एखाद्या ठिकाणी अंदाधुंद गोळीबार करून दहशत पसरवण्याचे कामही देण्यात आले होते.

Comments
Add Comment

मुंबई- बेंगळुरू प्रवास आता सुस्साट, 988 Km चं अंतर फक्त 16 तासांत पूर्ण करता येणार

मुंबई: केंद्रीय अवजड उद्योग आणि पोलाद मंत्री- एच. डी. कुमारस्वामी, केंद्रीय ग्राहक व्यवहार- प्रल्हाद जोशी, अन्न

Vande Bharat Sleeper: रात्री वाराणसीला शांत झोपायचं अन् सकाळी दिल्लीत उठायचं! वंदे भारत स्लीपरचं पाहा संपूर्ण शेड्युल

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपूर्वी भारतीय रेल्वेकडून 'नाईट ट्रेन'ची घोषणा करण्यात आली होती. ही एक्स्प्रेस

Badrinath Helicopter Crash Update: बद्रीनाथहून निघालेले हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये सहा जणांपैकी चौघांचा मृत्यू, दोन प्रवासी गंभीर जखमी

उत्तराखंड: उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यामध्ये बद्रीनाथ- डेहराडून दरम्यान धावणाऱ्या एका हॅलिकॉप्टरचा अपघात

Badrinath Helicopter Crash: मोठी दुर्घटना! बद्रीनाथहून निघालाले हेलिकॉप्टर जोशीमठमध्ये कोसळले, पायलटसह 6 जण बेपत्ता

उत्तराखंड: उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. चमोली जिल्ह्यातील बद्रीनाथ धाम

Railway News: ग्राहकांसाठी खुशखबर! मुंबईसह 8 शहरांमध्ये रेल्वेकडून थेट पार्सल घरपोच; स्टेशनवर जाण्याची कटकट गेली

नवी दिल्ली: भारतीय रेल्वेने आता नागरिकांच्या सेवेसाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. भारतीय रेल्वेकडून आता

Kanpur Viral News: 'पहिली पूजा मीच करणार'...; करवा चौथच्या पूजेसाठी तीन पत्नींमध्ये पोलीस ठाण्यातच रंगली जुंपली

Kanpur Viral News: करवा चौथचा सण विवाहित महिलांसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो. पतीच्या दीर्घायुष्यासाठी महिला दिवसभर