India Japan relations : भारत-जपान दरम्यान महत्त्वपूर्ण द्विपक्षीय करारावर स्वाक्षऱ्या

नवी दिल्ली : भारत आणि जपान यांच्यात आज महत्त्वपूर्ण द्विपक्षीय करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. दोन्ही देशांदरम्यान झालेल्या वार्षिक शिखर परिषदेनंतर कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तसेच औषधनिर्मिती क्षेत्राशी संबंधित अनेक करारांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित केले. आपल्या आत्मीयतेसाठी आणि मानवी नात्यांना जपणाऱ्या स्वभावासाठी जगभर प्रसिद्ध असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी(narendra Modi) यांनी जपानच्या समकक्ष पंतप्रधान सनाए ताकाइची यांचा उल्लेख आपल्या “लहान बहिणी” असा केला. पंतप्रधान मोदी म्हणाले, “माझी लहान बहीण पंतप्रधान सनाए ताकाइची, दोन्ही शिष्टमंडळांचे मान्यवर सदस्य, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, नमस्कार आणि ‘कोन्निचिवा’ (जपानी भाषेतील अभिवादन).” ते पुढे म्हणाले, “भारत-जपान(Bhart Japan) वार्षिक शिखर परिषदेसाठी पंतप्रधान सनाए ताकाइची यांच्या भारतातील पहिल्या दौऱ्याचे स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे. त्या जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत. त्याचबरोबर त्या दूरदृष्टी असलेल्या आणि व्यापक आदर मिळवलेल्या नेत्या आहेत. त्या नारा प्रांतातील असून, भारत आणि जपानच्या समान बौद्ध वारशाचे ते एक महत्त्वाचे केंद्र आहे.”



पंतप्रधान मोदी म्हणाले, “पंतप्रधान ताकाइची यांच्या या भेटीमुळे आपल्या ‘विशेष सामरिक आणि जागतिक भागीदारी’च्या नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. आज भारत आणि जपान हे दोन्ही देश जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी आहेत. मुक्त, समृद्ध आणि नियमाधारित ‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्र ही दोन्ही देशांची समान प्राथमिकता आहे. या प्रदेशातील सर्वात मोठ्या लोकशाही आणि बाजाराधारित अर्थव्यवस्था म्हणून आम्ही आज अनेक महत्त्वपूर्ण उपक्रमांवर सहमती दर्शवली आहे.”


यावेळी जपानच्या पंतप्रधान सनाए ताकाइची म्हणाल्या, “जपानच्या मेरीटाईम सेल्फ-डिफेन्स फोर्सचे एक विनाशिका युद्धनौका (डिस्ट्रॉयर) आणि भारतीय नौदलाचे एक युद्धनौकेद्वारे संयुक्त सराव करण्याची योजना आहे. आम्ही हिंदी महासागरातील संयुक्त सराव वाढवणार आहोत. तसेच नौदलाच्या देखभाल, दुरुस्ती आणि ओव्हरहॉल क्षेत्रातील सहकार्याला चालना देणार असून ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत संरक्षण उपकरणांच्या निर्मितीतील सहकार्यही अधिक मजबूत करू. हे सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी संबंधित विभागांना वर्षअखेरीपूर्वी पुढील भारत-जपान द्विपक्षीय बैठक आयोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.”



त्या पुढे म्हणाल्या, “पुढील वर्षी भारत आणि जपानमधील राजनैतिक संबंधांना ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने ‘भारत-जपान विशेष सामरिक आणि जागतिक भागीदारी’च्या माध्यमातून दोन्ही देशांतील जनतेला अधिक जवळ आणण्याची आमची इच्छा आहे, जेणेकरून विश्वासार्ह भागीदार म्हणून आपण समान सामरिक दिशा निश्चित करू शकू. माझे मोठे बंधू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकार्याने भारत-जपान संबंध नव्या उंचीवर पोहोचतील, असा मला विश्वास आहे. पुढील भेटीत जपानमध्ये पंतप्रधान मोदी यांचे स्वागत करण्यास मी उत्सुक आहे.”


जपानच्या पंतप्रधान सनाए ताकाइची यांनी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात त्यांना गार्ड ऑफ ऑनर देऊन औपचारिक स्वागत करण्यात आले.


भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, पंतप्रधान ताकाइची यांचा हा दौरा भारत आणि जपानमधील विशेष सामरिक आणि जागतिक भागीदारी अधिक बळकट करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. भारताच्या ईशान्येकडील राज्यांच्या विकासासाठी ‘भारत-जपान ॲक्ट ईस्ट फोरम’ हा स्वतंत्र संस्थात्मक मंच स्थापन करण्यात आला असून, अशा प्रकारची यंत्रणा असलेला जपान हा भारताचा एकमेव भागीदार देश आहे.

Comments
Add Comment

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि