Devendra Fadnavis : जामनेरमध्ये ग्रीनफिल्ड प्रकल्पासह राज्यात १ हजार २०० कोटींची गुंतवणूक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेससोबत करार

मुंबई : हिंदुस्तान कोका-कोला(Cococola) बेव्हरेजेसने जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे ग्रीनफिल्ड प्रकल्पासह राज्यात सुमारे १ हजार २०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली आहे. या गुंतवणुकीमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती, स्थानिक उद्योगांना चालना तसेच परिसराच्या आर्थिक विकासाला गती मिळेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सांगितले.



विधानभवन येथे जामनेर (जिल्हा जळगाव) येथील कोकाकोला प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ.पी. अनबळगन, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत रुपाणी, हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेस उपाध्यक्ष हिमांशू प्रियदर्शी, हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेस चे मुख्य एकात्मिक पुरवठा साखळी अधिकारी अविनाश कांत कुमार(Avinash Kumar) यावेळी उपस्थित होते.



मुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस म्हणाले की, गुंतवणूक, रोजगारनिर्मिती, सक्षम स्थानिक अर्थव्यवस्था, पर्यावरणपूरक विकास आणि समाजाभिमुख उपक्रमांच्या माध्यमातून राज्याच्या सर्वांगीण प्रगतीस हातभार लावणाऱ्या उद्योगांचे महाराष्ट्र नेहमीच स्वागत करतो. हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत रुपाणी यांनी सांगितले की महाराष्ट्रातील तीन उत्पादन केंद्रांद्वारे हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेसने राज्यातील विशेषतः दुर्गम तालुक्यांमध्ये रोजगारनिर्मितीला चालना दिली आहे. तसेच स्थानिक पुरवठा साखळी अधिक सक्षम करताना विविध सामाजिक विकास उपक्रमांद्वारे राज्यातील सुमारे ४६ लाख नागरिकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम घडवून आणला आहे.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : सुट्या खाद्य तेलाच्या विक्रीस वर्षभराची मुदतवाढ; मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

पारंपरिक व्यावसायिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी समिती स्थापन करणार मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए)

Ashish Shelar : दहिसर 'ट्रान्सपोर्ट हब'च्या कामादरम्यान 'ब्लास्टिंग' नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करा!

- पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश; बाधित इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट, खनिज वाहतुकीची चौकशी करावी मुंबई : दहिसर

Devendra Fadnavis : मंत्री नितेश राणे, संग्राम जगताप, महेश लांडगे हे हिंदू नायक, त्यांनी पुढेही हिंदुत्वासाठीच काम केले पाहिजे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकोद्गार

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे, आमदार संग्राम जगताप आणि महेश लांडगे हे तिघेही हिंदू नायक असून

AndheriNews : वीरा देसाई रोड, जे.पी, रोड, आझाद नगरमधील आता तुंबणार पाण्यातून होणार सुटका

मोगरा नाल्यातील प्रवाह आता वळवणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) अंधेरी पश्चिम येथील वीरा देसाई रोड, जे.पी.रोड आणि आझाद

BMC : मोठ्या मंडळांसाठी समन्वय अधिकारी नेमा; समन्वय समितीची महापालिकेकडे मागणी!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत मोठ्याप्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात, अशा मंडळांसाठी महापालिकेने समन्वय

Malad Accident : "तिला मला शेवटचं पाहायचं आहे..."; जखमी पतीने व्हीलचेअरवरून घेतले पत्नीचे अखेरचे दर्शन

मुंबई : मालाडमध्ये रविवारी रात्री झालेल्या भीषण रस्ता अपघाताने एका कुटुंबावर मोठा आघात केला. या अपघातात ३४