जम्मू-काश्मीर : सीआरपीएफचे वाहन उलटले; सहा जवान जखमी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी झालेल्या अपघातात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) वाहनाला अपघात होऊन सहा जवान जखमी झाले. श्रीनगर-लेह राष्ट्रीय महामार्गावरील सोनमर्ग (गगनगीर) बोगद्याजवळ हा अपघात घडला.



प्राथमिक माहितीनुसार, वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ते रस्त्यावरून घसरून उलटले. अपघातात वाहनातील सहा सीआरपीएफ जवान जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली आणि मदतकार्य सुरू करण्यात आले.



जखमी जवानांवर घटनास्थळी प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना गुंड येथील सीआरपीएफ छावणीत तसेच जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.या अपघाताची स्थानिक पोलिसांनी नोंद घेतली असून, नेमके कारण काय होते याचा तपास सुरू करण्यात आला आहे. अपघातामागील कारणांचा शोध घेण्यासाठी संबंधित यंत्रणा सखोल चौकशी करत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Comments
Add Comment

Jharkhand Accident News: पत्नीच्या शिक्षकपदी निवडीचा आनंद ठरला अखेरचा प्रवास; भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू

Jharkhand Accident News: पत्नीची शिक्षकपदी निवड झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी मंदिरात निघालेल्या एका कुटुंबावर काळाने घाला

Uttar Pradesh Viral video : हुंड्याच्या हव्यासापोटी मागितली थेट 'महिंद्रा थार'; वधूच्या कुटुंबीयांनी भरमांडवात दाखवला आरसा!

Uttar Pradesh Viral video: हुंड्याच्या मागणीला उत्तर देण्यासाठी वधूच्या कुटुंबीयांनी अनोखी शक्कल लढवल्याची घटना उत्तर

Haridwar Pod Taxi : हरिद्वारमध्ये 3,028 कोटींचा पॉड टॅक्सी प्रकल्प; हर की पौरी, मनसा देवीसह प्रमुख ठिकाणे जोडणार

Haridwar Pod Taxi : हरिद्वारमध्ये धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्या भाविकांना आणि पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू

Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेसच्या जेवणात आढळला लोखंडी बोल्ट; प्रवाशाचा व्हिडिओ व्हायरल, IRCTCकडून माफी

Vande Bharat Express: वंदे भारत एक्सप्रेसमधील जेवणाच्या गुणवत्तेबाबत गंभीर तक्रार समोर आली आहे. बंगळूरुहून बेळगावीला प्रवास

Haridwar Kumbh 2027 : हरिद्वार कुंभ 2027 मध्ये ‘नेत्र कुंभ’चे आयोजन; 1.5 लाख भाविकांची मोफत नेत्रतपासणी, 10 हजार शस्त्रक्रियांचे लक्ष्य

Haridwar Kumbh 2027: हरिद्वार कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी 45 दिवसांचे ‘नेत्र कुंभ’ महाशिबिर आयोजित करण्यात

'काशी तमिळ संगमम ५.०'ला सुरुवात, २०७ प्रतिनिधींची पहिली तुकडी विशेष रेल्वेने वाराणसीकडे रवाना

चेन्नई : तमिळनाडू आणि काशी यांच्यातील ऐतिहासिक व सांस्कृतिक नाते अधिक दृढ करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या