Indian Navy : भारतीय नौदलाची ताकद वाढणार; 'आयएनएस महेंद्रगिरी' आणि 'आयएनएस मालवण' लवकरच ताफ्यात येणार

नवी दिल्ली : भारतीय नौदलाची सागरी ताकद आणखी वाढणार असून लवकरच ‘आयएनएस महेंद्रगिरी’ आणि ‘आयएनएस मालवण’ या दोन अत्याधुनिक युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात अधिकृतपणे सामील होणार आहेत. या दोन्ही युद्धनौकांमुळे भारताची किनारी सुरक्षा, सागरी गस्त आणि पाणबुडीविरोधी क्षमता अधिक मजबूत होणार असून देशाच्या सागरी संरक्षणाला नवे बळ मिळणार आहे.



गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांच्या हस्ते कोलकाता येथे 'आयएनएस अग्रय', 'आयएनएस संशोधक' आणि 'आयएनएस द्रोणागिरी' या तीन युद्धनौकांचे राष्ट्राला समर्पण करण्यात आले होते. त्यानंतर आता 'आयएनएस महेंद्रगिरी' आणि 'आयएनएस मालवण'(INS Malvan)ही नौदलात दाखल करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. 'आयएनएस मालवण' ही अँटी-सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट प्रकारातील युद्धनौका असून तिची निर्मिती कोचीन शिपयार्डमध्ये करण्यात आली आहे. ३० एप्रिल(April) २०१९ रोजी तिची ऑर्डर देण्यात आली होती, तर ३० नोव्हेंबर २०२३ रोजी जलावतरण झाले. ३१ मार्च २०२६ रोजी ही नौका भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली. ८० मीटर लांब, ११.३६ मीटर रुंद आणि ११०० टन वजनाची ही नौका ट्रिपल जेट वॉटर प्रणालीमुळे २५ नॉट्स वेगाने धावू शकते. आधुनिक रडार, हल-माउंटेड सेन्सर्स, हलक्या वजनाचे टॉर्पेडो आणि पाणबुडीविरोधी रॉकेट्स ही तिची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.



'आयएनएस महेंद्रगिरी' ही नीलगिरी क्लासमधील अत्याधुनिक स्टेल्थ फ्रिगेट असून तिची बांधणी मुंबईतील माझगाव डॉकमध्ये करण्यात आली आहे. २८ जून २०२२ रोजी बांधकामाला सुरुवात झाली, तर १ सप्टेंबर २०२३ रोजी जलावतरण करण्यात आले. ३० एप्रिल २०२६ रोजी हे जहाज नौदलाकडे सुपूर्द करण्यात आले.'आयएनएस महेंद्रगिरी'मध्ये ब्रह्मोस क्रूझ क्षेपणास्त्रे, ७६ मिमी नौदल तोफ, वरुणास्त्र टॉर्पेडो प्रणाली, रॉकेट लाँचर्स तसेच ध्रुव किंवा सी-किंग हेलिकॉप्टर तैनात करण्याची क्षमता आहे. अत्याधुनिक रडार आणि सोनार प्रणालीमुळे शत्रूची जहाजे व पाणबुड्यांचा अचूक शोध घेण्याची क्षमता या युद्धनौकेला प्राप्त झाली आहे. या दोन्ही युद्धनौका नौदलात दाखल झाल्यानंतर भारताच्या सागरी संरक्षण व्यवस्थेला मोठे बळ मिळणार असल्याचे मानले जात आहे.

Comments
Add Comment

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

IST Mandatory 2027 : मार्च २०२७ पासून देशभरात इंडियन स्टँडर्ड टाइम बंधनकारक

नवी दिल्ली : देशातील सर्व संस्था, कंपन्या आणि संबंधित आस्थापनांना मार्च २०२७पासून कायदेशीर, व्यावसायिक, डिजिटल

Manjit Kaur : लिव्ह-इन पार्टनरच्या अत्याचारानंतर ५४ दिवस मृत्यूशी झुंज; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौरचा मृत्यू

मनजीत कौरचा लिव्ह-इन पार्टनर आणि त्याच्या एका साथीदाराच्या क्रूरतेनंतर ५४ दिवस रुग्णालयात जिद्दीने जगण्यासाठी