Crime News : प्रियकरासाठी पतीचा 'गेम', आधी छतावरून फेकलं, मग रुग्णालयात केला 'काम तमाम'

नर्स पत्नीची क्रूरता पाहून पोलीसही हादरले; पतीला मारण्यासाठी आखला प्लॅन 


तेलंगणा : तेलंगणामध्ये विवाहबाह्य संबंधातून पतीच्या हत्येचा (Murder) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नर्स म्हणून काम करणाऱ्या महिलेने प्रियकर आणि त्याच्या साथीदाराच्या मदतीने 35 वर्षीय पतीची हत्या केल्याचा आरोप असून, या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.



पोलिसांच्या माहितीनुसार, मृत प्रशांत काही दिवसांपूर्वी आखाती देशातून भारतात परतला होता. भारतात आल्यानंतर पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याची माहिती त्याला मिळाली होती. यानंतर पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असल्याचे तपासात समोर आले आहे. (Crime News)


तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपींनी प्रथम प्रशांतला मद्यपान करून एका इमारतीच्या गच्चीवर नेले आणि खाली ढकलल्याचा आरोप आहे. मात्र, तो गंभीर जखमी अवस्थेत बचावला. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.


पोलिसांचा आरोप आहे की, रुग्णालयात उपचार सुरू असताना आरोपी पत्नीने नर्स म्हणून असलेल्या ज्ञानाचा वापर करून सलाईनद्वारे टॉयलेट क्लिनर आणि भूल देणारे औषध शरीरात दिले. यानंतर उपचारादरम्यान प्रशांतचा मृत्यू झाला. (wife kills husband)



या प्रकरणात पत्नी, तिचा प्रियकर आणि आणखी एका साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. तिघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.


या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून मृत्यूचे नेमके कारण आणि इतर पुरावे तपासले जात आहेत.


Comments
Add Comment

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि

Dr. Koyyala Ruth John Paul: संघर्षातून यशाकडे! भारतातील तृतीयपंथीयांचा वैद्यकीय क्षेत्रात नवा इतिहास

मुंबई: तृतीयपंथातील अनेक व्यक्तींना आजही सामाजिक भेदभाव, शिक्षणातील अडचणी, रोजगाराच्या मर्यादित संधी आणि