Devendra Fadnavis : सावंतवाडीत आता 'राजधानी'सह ३ महत्त्वाच्या गाड्या थांबणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

- रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून मंजुरीचे पत्र


मुंबई : कोकण रेल्वेवरील प्रवाशांसाठी आणि विशेषतः दक्षिण कोकणातील नागरिकांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशनवर आता 'राजधानी एक्सप्रेस' आणि 'गरीब रथ' यांसारख्या अतिवेगवान आणि महत्त्वाच्या ३ लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या थांब्यांसाठी अधिकृत मंजुरी दिल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. या निर्णयामुळे कोकणची रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार असून, आगामी काळात येथील पर्यटन व्यवसायाला आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा बुस्ट मिळणार आहे.



मुख्यमंत्र्यांनी २५ मार्च २०२६ रोजी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहून जनसुविधेसाठी सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशनवर महत्त्वाच्या गाड्यांना थांबा देण्याची मागणी केली होती. या पत्राची दखल घेत रेल्वे मंत्रालयाने ७ जुलै २०२६ रोजी या मागण्यांना मंजुरी देणारे पत्र जारी केले आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुख्यमंत्र्यांना (Devendra Fadnavis) पाठवलेल्या पत्रात नमूद केल्यानुसार, आता सावंतवाडी रोड स्टेशनवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मंगळुरू एक्सप्रेस, तिरुवनंतपुरम सेंट्रल - हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) – तिरुवनंतपुरम उत्तर (कोच्छुवेली) गरीब रथ एक्सप्रेस या गाड्या थांबणार आहेत.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : सुट्या खाद्य तेलाच्या विक्रीस वर्षभराची मुदतवाढ; मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

पारंपरिक व्यावसायिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी समिती स्थापन करणार मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए)

Ashish Shelar : दहिसर 'ट्रान्सपोर्ट हब'च्या कामादरम्यान 'ब्लास्टिंग' नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करा!

- पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश; बाधित इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट, खनिज वाहतुकीची चौकशी करावी मुंबई : दहिसर

Devendra Fadnavis : मंत्री नितेश राणे, संग्राम जगताप, महेश लांडगे हे हिंदू नायक, त्यांनी पुढेही हिंदुत्वासाठीच काम केले पाहिजे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकोद्गार

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे, आमदार संग्राम जगताप आणि महेश लांडगे हे तिघेही हिंदू नायक असून

AndheriNews : वीरा देसाई रोड, जे.पी, रोड, आझाद नगरमधील आता तुंबणार पाण्यातून होणार सुटका

मोगरा नाल्यातील प्रवाह आता वळवणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) अंधेरी पश्चिम येथील वीरा देसाई रोड, जे.पी.रोड आणि आझाद

BMC : मोठ्या मंडळांसाठी समन्वय अधिकारी नेमा; समन्वय समितीची महापालिकेकडे मागणी!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत मोठ्याप्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात, अशा मंडळांसाठी महापालिकेने समन्वय

Malad Accident : "तिला मला शेवटचं पाहायचं आहे..."; जखमी पतीने व्हीलचेअरवरून घेतले पत्नीचे अखेरचे दर्शन

मुंबई : मालाडमध्ये रविवारी रात्री झालेल्या भीषण रस्ता अपघाताने एका कुटुंबावर मोठा आघात केला. या अपघातात ३४