Trimbakeshwar Rain Update : त्र्यंबकेश्वरमध्ये पाणीच पाणी; अनेक गावांचा संपर्क तुटला

Trimbakeshwar Rain Update : त्र्यंबकेश्वरमध्ये पावसाने रौद्ररूप धारण केल्याचं चित्र पाहायला मिळतंय. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेनंतर, आज (बुधवारी) मध्यरात्रीनंतर त्र्यंबकेश्वर नगरीत (Trimbakeshwar ) मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्र्यंबकनगरीत पहाटेच्या सुमारास झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे त्र्यंबकेश्वरमधील मुख्य रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही नगरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, काही सखल भागांत तब्बल पाऊण तास पाणी साचून राहिले होते.



मुसळधार पावसामुळे वाहतूक ठप्प


मुसळधार पावसामुळे त्र्यंबकेश्वर शहरातील भगवती चौक, बोहर पट्टी, मेन रोड, लक्ष्मी नारायण चौक आणि गंगाकाठ स्लॅब या भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचं बघायला मिळालं. मुसळधार पावसामुळे याठिकाणी वाहतूक ठप्प झाली असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. दरम्यान, अनेक ठिकाणी दरवर्षीप्रमाणे पूरसदृश पाणी रस्त्यांवरून वाहत होते. साधारण पाऊण तास हे पाणी या भागात थांबून होते, त्यामुळे नागरिकांमध्ये काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.


पहाटे चार वाजेच्या सुमारास पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पाण्याचा निचरा झाला त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. दरम्यान, शहरात मोठ्या प्रमाणात कुंभमेळ्याची कामे सुरु आहे. कुंभमेळा कामांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे संपूर्ण परिसरात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या चिखलामुळे स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. (Trimbakeshwar Rain Update )



नद्यांच्या पाणीपातळीत वाढ


पहाटे झालेल्या या धुवांधार पावसामुळे पुष्करणी नदी, गंगासागरकडून येणारे पाणी, म्हातारा ओहळ, निलगंगा, गोदावरी आणि अहिल्या नदीच्या पाण्याच्या पातळीत प्रचंड वाढ झाली. अहिल्या आणि गोदावरी नदीच्या संगम घाटावर पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगाने वाहत होता. तर मुसळधार पावसामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंपळद येथील किकवी नदीचा पूल पाण्याखाली गेल्याने साबरवाडी, ब्राम्हणवाडे, माळेगाव, दिव्याचा पाडा या गावांचा संपर्क तुटला आहे. पूलावर पाणी असल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. (Trimbakeshwar Rain Update )



नागरिकांना सतर्कतेचा इशारा


त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) आणि परिसरात पावसाचा जोर कायम असल्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, तसेच कुंभमेळा कामांच्या ठिकाणी चिखल व खड्डे असल्याने प्रवास करताना काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तर नाशिकमध्ये पुराचं प्रमाण मानल्या जाणाऱ्या रामकुंड येथील दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी लागले होते, आता हे पाणी काही प्रमाणात ओसरण्यास सुरुवात झाली आहे. ढगसदृश्य परिस्थिती नाशिकमध्ये टळली असली तरी मुसळधार पावसाने शहरात देखील पाणीच पाणी झाले आहे.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण