Amayra Suicide Case : वर्गशिक्षिकेकडे वारंवार मदत मागितली पण.., अमायराच्या आत्महत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे

अमायराच्या आत्महत्याप्रकरणी  शाळेच्या भूमिकेवर प्रश्न, त्या क्षणाच्या व्हिडिओ व्हायरल 


जयपूर : जयपूरमधील (Jaipur) नीरजा मोदी (Nirja Modi) शाळेत इयत्ता चौथीत शिकणाऱ्या ९ वर्षीय अमायराच्या आत्महत्याप्रकरणी तिच्या कुटुंबीयांनी सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक केले आहे. या फुटेजमध्ये घटनेपूर्वीचे काही क्षण दिसत असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. मुलीने शाळेच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारण्यापूर्वी मदतीसाठी प्रयत्न केल्याचे या फुटेजमध्ये दिसत असल्याचे त्यांनी सांगितले. (Amayra Suicide Case)


पत्रकार परिषदेत बोलताना अमायराच्या पालकांनी आरोप केला की, वर्गात काही अयोग्य प्रकार घडल्यानंतर त्यांची मुलगी वर्गशिक्षिकेकडे वारंवार मदत मागत होती. मात्र तिच्या तक्रारीकडे गांभीर्याने लक्ष देण्यात आले नाही, असा त्यांचा दावा आहे.


कुटुंबीयांच्या मते, फुटेजमध्ये अमायरा वर्गाबाहेर अस्वस्थ अवस्थेत धावताना दिसते. ती शाळेच्या इमारतीतून वरच्या मजल्यांकडे गेली, मात्र या काळात तिला कोणी थांबवले नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे.


दरम्यान, जयपूर पोलिसांनी या प्रकरणात आरोपपत्र दाखल केले असून तपास सुरू आहे. कुटुंबीयांनी तपास यंत्रणांनी सर्व संबंधित व्यक्तींची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी केली आहे. (Amayra Suicide)



शाळा प्रशासनाकडून या आरोपांवर अद्याप सविस्तर प्रतिक्रिया समोर आलेली नाही. पोलिस तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतरच घटनेबाबत अंतिम निष्कर्ष स्पष्ट होणार आहेत.


Comments
Add Comment

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि

Dr. Koyyala Ruth John Paul: संघर्षातून यशाकडे! भारतातील तृतीयपंथीयांचा वैद्यकीय क्षेत्रात नवा इतिहास

मुंबई: तृतीयपंथातील अनेक व्यक्तींना आजही सामाजिक भेदभाव, शिक्षणातील अडचणी, रोजगाराच्या मर्यादित संधी आणि