National Anthem : राष्ट्रगीत गायनासंदर्भात नवीन नियमावलीच योग्य क्रम, अचूक शब्द आणि स्पष्ट उच्चार यांचे काटेकोरपणे पालन अनिवार्य

नवी दिल्ली : केंद्रीत गृह मंत्रालयाने राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान गायनासंदर्भात सर्व राज्य सरकारे, केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय मंत्रालयांना नवीन व कडक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या नव्या निर्देशांनुसार, राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान गाताना किंवा वाजवताना त्यांचे नियम, योग्य क्रम, अचूक शब्द आणि स्पष्ट उच्चार यांचे काटेकोरपणे पालन करणे अनिवार्य करण्यात आले आहे.गृह मंत्रालयाने ९ जुलै २०२६ रोजी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना आणि केंद्र सरकारच्या विविध विभागांच्या सचिवांना पत्र लिहून या आदेशांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. या नवीन नियमांनुसार, ज्या कार्यक्रमांमध्ये राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान हे दोन्ही सादर केले जाणार आहेत, तिथे एक निश्चित क्रम पाळणे आवश्यक आहे.(India)



नेमका नियम काय?


कार्यक्रमांमध्ये सर्वात आधी राष्ट्रगीत गायले किंवा वाजवले जाईल आणि त्यानंतरच राष्ट्रगान सादर केले जाईल. याशिवाय, ज्या राज्यांचे स्वतःचे राज्यगीत (उदा. महाराष्ट्राचे ‘जय जय महाराष्ट्र माझा्र)(Maharashtra) आहे, तिथे राज्यगीत देखील राष्ट्रगीत आणि राष्ट्रगानाच्या नियमांनुसारच सादर केले जाईल. अशा वेळीही राष्ट्रगीत आधी आणि त्यानंतर राष्ट्रगान वाजवण्याचा क्रम कायम राहील, असे गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.



उच्चारांच्या चुकांवर ठेवले बोट


गृह मंत्रालयाने राष्ट्रगीत आणि राष्ट्रगानाच्या सादरीकरणादरम्यान होणाऱ्या उच्चारांच्या चुकांवर गंभीरपणे बोट ठेवले आहे. हे दोन्ही राष्ट्रीय सन्मान सादर करताना त्यांचे अचूक शब्द, मूळ भाषा आणि योग्य उच्चार याकडे विशेष लक्ष देण्यास सांगण्यात आले आहे. नागरिकांना आणि संस्थांना याचे नियम समजणे सोपे जावे म्हणून राष्ट्रगीत आणि राष्ट्रगानाचा अधिकृत पाठ आणि त्यांचे योग्य उच्चार गृह मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या आदेशाची प्रत राष्ट्रपती सचिवालय, पंतप्रधान कार्यालय, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालये आणि निवडणूक आयोगासह सर्व महत्त्वाच्या घटनात्मक संस्थांना पाठवण्यात आली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक नजर ठेवण्यास सांगण्यात आले आहे.

Comments
Add Comment

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि

Dr. Koyyala Ruth John Paul: संघर्षातून यशाकडे! भारतातील तृतीयपंथीयांचा वैद्यकीय क्षेत्रात नवा इतिहास

मुंबई: तृतीयपंथातील अनेक व्यक्तींना आजही सामाजिक भेदभाव, शिक्षणातील अडचणी, रोजगाराच्या मर्यादित संधी आणि