Medha Manjrekar : अभिनेत्री मेधा मांजरेकर यांची कॅन्सरशी झुंज, शेअर केली भावुक पोस्ट

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री मेधा मांजरेकर (Medha Manjrekar) यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत आपल्या गंभीर आजाराबाबत प्रथमच खुलासा केला आहे. उपचारादरम्यानचे काही फोटो (Photo) शेअर करत त्यांनी कॅन्सरशी दिलेल्या लढ्याचा अनुभव मांडला असून, त्यांच्या या पोस्टने चाहत्यांसह अनेक कलाकारही भावुक झाले आहेत.



मेधा मांजरेकर यांनी लिहिले की, त्यांच्या उपचारांचा एक महत्त्वाचा टप्पा आता पूर्ण होत आला आहे. या प्रवासात सर्जरी, केमोथेरपी (chemotherapy) आणि रेडिएशनसारख्या कठीण उपचारांना सामोरे जावे लागले. मात्र, या संपूर्ण काळात आपण कधीच एकट्या नव्हतो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.


त्यांनी आपल्या गुरू, डॉक्टर, परिचारिका, कुटुंबीय, मित्र-मैत्रिणी आणि अगदी अनोळखी व्यक्तींनीही दिलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. संकटाच्या प्रत्येक क्षणी कोणीतरी मदतीला धावून आले आणि त्यातूनच पुढे जाण्याची ताकद मिळाली, असे त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे.



मेधा यांनी आपल्या मुलींबद्दलही भावनिक शब्दांत लिहिले. आयुष्यभर आई मुलांचा हात धरते, पण या प्रवासात मुलींनीच आपला हात धरून आधार दिला, असे त्यांनी सांगितले. पती महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनीही प्रत्येक टप्प्यावर खंबीरपणे साथ दिल्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानले. ( (Cancer Threatment))





उपचारांदरम्यान मित्र-मैत्रिणींनी केलेल्या छोट्या-छोट्या गोष्टींचाही त्यांनी उल्लेख केला. आवडीचे पदार्थ आणणे, वेळ देणे, प्रार्थना करणे आणि सतत सकारात्मक वातावरण ठेवण्याचा प्रयत्न यामुळे कठीण काळ अधिक सुसह्य झाल्याचे त्यांनी सांगितले.


मेधा मांजरेकर यांच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या धैर्याचे कौतुक करत लवकर पूर्णपणे निरोगी व्हावे, अशा शुभेच्छांचा वर्षाव सोशल मीडियावर होत आहे.

Comments
Add Comment

Madhuri Dixit: 'धक धक गर्ल'चा गुलाबी साडीत घायाळ करणारा लूक, पाहा Photos

[caption id="attachment_1067345" align="aligncenter" width="800"] अभिनेत्री माधुरी दीक्षितने आपल्या सौंदर्याच्या जोरावर बॉलिवूड इंडस्ट्रीवर अधिराज्य

सिद्धु मुसेवालाच्या छोट्या भावामुळे आई- वडिलांविरोधात तक्रार दाखल, नेमकं काय घडलं?

मुंबई: प्रसिद्ध पंजाबी गायक आणि रॅपर सिद्धु मुसेवाला आज या जगात नाही, जरीही तो आज आपल्यात नसला तरीही तो त्याच्या

रेशनवरून वाद, नॉमिनेशनचा फटका! नकुलनंतर आता कोणाची होणार बिग बॉसच्या घरातून एक्झिट?

कलर्स टीव्हीवरील लोकप्रिय शो 'बिग बॉस २०' हा स्पर्धकांमधील अटीतटीच्या स्पर्धेमुळे आणि घरातील वादांमुळे सतत

Radhika Apte New Series: रहस्य, थरार आणि सत्तेचा खेळ! राधिका आपटेच्या ‘अक्का’ची पहिली झलक समोर

अभिनेत्री राधिका आपटे आणि कीर्ती सुरेश लवकरच ‘अक्का’ या आगामी सीरिजमध्ये एकत्र दिसणार आहेत. 1980 च्या दशकातील

Sita As A Warrior : 'रामायण' चित्रपटाच्या नव्या प्रोमोत साई पल्लवीचा धडाकेबाज ॲक्शन अवतार; प्रेक्षकांनी मानले दिग्दर्शकाचे आभार

मुंबई : रणबीर कपूर, (Ranbir Kapoor) यश (Yash) आणि साई पल्लवी (Sai Pallavi) यांची प्रमुख भूमिका असलेला 'रामायण' (Ramayan) हा चित्रपट सध्या

Kareena-Saif Love Story : ...तर माझे किती पैसे वाचले असते, करीनाला असं का म्हणाला सैफ अली खान ?

Kareena And Saif : बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडप्यांमध्ये करीना कपूर आणि सैफ अली खान यांचे नाव आवर्जून घेतले जाते. लग्नाला १४