Viral Video : 'आईने लग्न ठरवलं...', तरुणीने भलतंच कांड केला; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर एका तरुणीचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल (Viral) होत आहे. या व्हिडिओमध्ये ती शांतपणे खुर्चीवर बसून स्वतःचे मुंडन केल्याचे दिसते. मात्र, या व्हिडिओसोबत दिलेल्या "POV: माझ्या आईने माझे लग्न ठरवले" या कॅप्शनमुळे चर्चांना उधाण आले आहे.



व्हिडिओतील तरुणीचे नाव कीर्तन मेनन असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, तिने केस काढण्यामागचे नेमके कारण कुठेही स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे सोशल मीडियावर विविध तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे. ( Viral Girl)

काही नेटकऱ्यांनी हा प्रकार इच्छेविरुद्ध ठरवण्यात आलेल्या लग्नाविरोधातील निषेध असल्याचे म्हटले आहे. तर काहींनी याकडे महिलांच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचे आणि स्वतःचे निर्णय घेण्याच्या अधिकाराचे प्रतीक म्हणून पाहिले आहे.



मात्र, या सर्व दाव्यांना अद्याप कोणताही अधिकृत आधार मिळालेला नाही. केस काढण्यामागे धार्मिक परंपरा, केसदान, वैयक्तिक निर्णय किंवा केवळ सोशल मीडियासाठी तयार केलेला आशय असू शकतो. यापैकी कोणत्याही कारणाची पुष्टी झालेली नाही. (Viral Reels)



व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी तिच्या निर्णयाचे समर्थन केले असून, काहींनी कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी संपूर्ण माहिती समोर येण्याची वाट पाहण्याचा सल्ला दिला आहे.

दरम्यान, कीर्तन मेननने या व्हायरल व्हिडिओमागील वास्तविक कारण अद्याप जाहीर केलेले नसल्याने, या घटनेबाबतचा संभ्रम कायम आहे. एका छोट्याशा व्हिडिओने आणि एका कॅप्शनने सोशल मीडियावर मोठी चर्चा निर्माण केली आहे.
Comments
Add Comment

Viral Video : धावत्या बाईकवर उभे राहून तरुणाचा धोकादायक स्टंट; व्हिडीओ व्हायरल, सारण पोलिसांकडून FIR दाखल

Viral Video : सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही जण सार्वजनिक रस्त्यांवर धोकादायक स्टंट करत असल्याचे प्रकार

Jharkhand Accident News: पत्नीच्या शिक्षकपदी निवडीचा आनंद ठरला अखेरचा प्रवास; भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू

Jharkhand Accident News: पत्नीची शिक्षकपदी निवड झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी मंदिरात निघालेल्या एका कुटुंबावर काळाने घाला

Uttar Pradesh Viral video : हुंड्याच्या हव्यासापोटी मागितली थेट 'महिंद्रा थार'; वधूच्या कुटुंबीयांनी भरमांडवात दाखवला आरसा!

Uttar Pradesh Viral video: हुंड्याच्या मागणीला उत्तर देण्यासाठी वधूच्या कुटुंबीयांनी अनोखी शक्कल लढवल्याची घटना उत्तर

Haridwar Pod Taxi : हरिद्वारमध्ये 3,028 कोटींचा पॉड टॅक्सी प्रकल्प; हर की पौरी, मनसा देवीसह प्रमुख ठिकाणे जोडणार

Haridwar Pod Taxi : हरिद्वारमध्ये धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्या भाविकांना आणि पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू

Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेसच्या जेवणात आढळला लोखंडी बोल्ट; प्रवाशाचा व्हिडिओ व्हायरल, IRCTCकडून माफी

Vande Bharat Express: वंदे भारत एक्सप्रेसमधील जेवणाच्या गुणवत्तेबाबत गंभीर तक्रार समोर आली आहे. बंगळूरुहून बेळगावीला प्रवास

Haridwar Kumbh 2027 : हरिद्वार कुंभ 2027 मध्ये ‘नेत्र कुंभ’चे आयोजन; 1.5 लाख भाविकांची मोफत नेत्रतपासणी, 10 हजार शस्त्रक्रियांचे लक्ष्य

Haridwar Kumbh 2027: हरिद्वार कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी 45 दिवसांचे ‘नेत्र कुंभ’ महाशिबिर आयोजित करण्यात