Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळावरून अबू धाबीसाठी आठवड्यातून तीन दिवस थेट विमान सेवा

नवी मुंबई विमानतळ : अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेड (AAHL) संचलित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (NHIA) नियोजित आंतरराष्ट्रीय विमानसेवेला प्रारंभ झाला असून, एअर इंडिया एक्सप्रेस १५ जुलैपासून नवी मुंबई–अबू धाबी मार्गावर आठवड्यातून तीन दिवस थेट उड्डाण सेवा सुरू करणार आहे.



२५ डिसेंबर २०२५ रोजी देशांतर्गत सेवा सुरू झाल्यानंतर अवघ्या २०० दिवसांतच विमानतळाने आंतरराष्ट्रीय सेवेचा टप्पा गाठला आहे. या सेवेमुळे मुंबई महानगर प्रदेशातील प्रवाशांना संयुक्त अरब अमिरातीच्या राजधानी अबू धाबीसाठी थेट आणि अधिक सोयीस्कर हवाई संपर्क उपलब्ध होणार आहे. तसेच, अदानी एअरपोर्ट होल्डिंग्जच्या अखत्यारीतील सर्व विमानतळ आता आंतरराष्ट्रीय सेवांशी जोडले गेले आहेत. अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण बन्सल म्हणाले की, "नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवासातील हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध यंत्रणा, नियामक संस्था तसेच सर्व भागधारकांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले. पहिल्या आंतरराष्ट्रीय मार्गासाठी एअर इंडिया एक्सप्रेसने दिलेल्या सहकार्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. येत्या काळात अधिक विमान कंपन्या आणि नव्या आंतरराष्ट्रीय गंतव्यांचा समावेश करत जागतिक दर्जाचा प्रवास अनुभव देण्यावर आमचा भर राहील.(Navi Mumabi)



एअर इंडिया एक्सप्रेसचे अध्यक्ष निपुण अग्रवाल म्हणाले की, "नवी मुंबई विमानतळावरून अबू धाबीसाठी थेट सेवा सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे. या मार्गामुळे मुंबई महानगर प्रदेशातील प्रवाशांना यूएईसाठी आणखी एक सोयीस्कर पर्याय उपलब्ध होईल. आमच्या दुहेरी विमानतळ धोरणात नवी मुंबई विमानतळाची महत्त्वाची भूमिका असून, या भागीदारीतून भविष्यात आणखी व्यापक हवाई संपर्क निर्माण करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत." अबू धाबी हा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील पहिला आंतरराष्ट्रीय मार्ग असून, लवकरच आणखी अनेक आंतरराष्ट्रीय गंतव्ये या जाळ्यात समाविष्ट होणार आहेत. त्यामुळे मुंबईच्या वाढत्या हवाई वाहतूक क्षमतेला बळ मिळण्यासह भारताच्या आंतरराष्ट्रीय संपर्क, व्यापार आणि पर्यटनालाही चालना मिळणार आहे.(Air India)



अवघ्या सात महिन्यांत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने ४६ देशांतर्गत शहरांशी हवाई संपर्क प्रस्थापित करत २३ लाखांहून अधिक प्रवाशांना सेवा दिली आहे. सध्या या विमानतळावर दररोज सुमारे १५० हवाई वाहतूक हालचाली होत आहेत. पहिल्या आंतरराष्ट्रीय उड्डाणाद्वारे नाशवंत वस्तूंच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय निर्यात मालवाहतुकीलाही सुरुवात झाली आहे. त्यामुळे भारतीय निर्यातदारांना जागतिक बाजारपेठेत अधिक वेगाने पोहोचण्याची संधी उपलब्ध होणार असून, विमानतळाच्या मालवाहतूक क्षमतेलाही नवी दिशा मिळणार आहे.

Comments
Add Comment

Maharashtra SIR Voter List : राज्यातील विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध

- २ कोटींहून अधिक मतदारांची नावे वगळली; ३० सप्टेंबरपर्यंत दाखल करता येणार हरकती  मुंबई : विशेष सखोल पुनरिक्षण

Elon Musk :‘फक्त शाश्वत ऊर्जा पुरेशी नाही’; पृथ्वीच्या भवितव्याबाबत एलॉन मस्क यांचा मोठा इशारा

टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख एलॉन मस्क यांनी पृथ्वीच्या दीर्घकालीन भवितव्याबाबत महत्त्वाचा इशारा दिला आहे.

Jalgaon Crime : संतापजनक ! ‘दुधा’च्या नावाखाली काळा धंदा ! गायीच्या दुधात चक्क 'या' तेलाची भेसळ अन् पुढे...

Jalgaon Crime : गायीच्या दुधात थेट सोयाबीन तेल मिसळून त्याची फॅट वाढवायची आणि हेच भेसळयुक्त दूध ‘म्हशीचे दूध’ म्हणून

Ulhasnagar Stamp Duty Amnesty Scheme : उल्हासनगरवासीयांना दिलासा! अभय योजनेला मुदतवाढ देण्याचा बावनकुळेंचा निर्णय

मुंबई : उल्हासनगर शहरातील प्रलंबित मुद्रांक शुल्क प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी "महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Nashik Crime : एटीएसच्या नावाने ‘डिजिटल अरेस्ट’, नाशिकच्या मॅनेजरची ९० लाखांची फसवणूक

Nashik Crime : नाशिकमध्ये सायबर फसवणुकीचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुन्हेगारांनी स्वतःला एटीएस आणि मुंबई