COVID-19 Variant : आंध्र प्रदेशमध्ये कोरोना विषाणूचा नवा अवतार सक्रीय झाल्याची शक्यता, दोन मृत्यूंनी खळबळ

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशमध्ये कोरोनाची लागण झाल्याने दोन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. २०२२ नंतर पहिल्यांदाच आंध्र प्रदेशात कोरोनाने मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे. इतर आठ जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. कोरोनाची ही प्रकरणे तुरळक स्वरूपातील असून कोरोनाचा उद्रेक झाल्याचे समजू नये, असे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. तिरूपती येथील श्री व्यंकटेश्वरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये एका ६० वर्षीय व्यक्तीला उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर शेजारील राज्य तमिळनाडूतील वेल्लोर येथे त्याला शिफ्ट करण्यात आले. उपचार सुरू असताना २८ जून रोजी या व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाल्याचे निदान झाले. ही व्यक्ती मधूमेह तसेच मूत्रपिंडाशी संबंधित व इतर काही आजारांनी ग्रासलेली होती. शवविच्छेदन व आरटी-पीसीआर टेस्टमधून कोरोनाचे (Covid19) निदान झाले.




आंध्र प्रदेशातील कडपा शहरात एका ४६ वर्षीय व्यक्तीला सरकारी रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. ७ जुलै रोजी या रूग्णाचाही मृत्यू झाला. या रूग्णाला श्वास घेण्यात अडचण येत होते. सततच्या कफमुळे त्यांची फुफ्फुसांचे नुकसान झाले होते. त्यांना न्युमोनिया झाला होता. फुफ्फुसांचे नुकसान आणि कोरोना (कोविड – १९) झाल्याचे निदान छातीचा सीटी स्कॅन काढल्यानंतर झाले होते. कोरोनाने लागोपाठ दोन मृत्यू झाल्यानंतर आंध्र प्रदेशची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. ‘कोरोनाचे पाच रूग्ण कडपा शहरात आढळले आहेत, तर इतर तीन रूग्ण हे त्यांच्या संपर्कात होते. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. घाबरून जाण्याची गरज नाही. ही प्रकरणे तुरळक स्वरूपातील (स्पोरॅडिक केसेस) आहेत’, असे आंध्र प्रदेशचे आरोग्य सचिव एस. सुरेश कुमार यांनी सांगितले.



आंध्र प्रदेश सरकारने कोरोना रूग्णांच्या व दोन मृतांच्या नाक व घशातील स्रावाचे नमुने पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीत पाठवले आहे. जिनोम सिक्वेन्सिंगसाठी हे नमुने पाठवण्यात आले. ‘चाचणीचा अहवाल काय येतो याची वाट पाहणे सुरू आहे. पुढील काही दिवसांत चाचण्यांचे अहवाल हाती येतील अशी आशा आहे’, असे कुमार म्हणाले. दरम्यान, पाच तज्ज्ञांची एक समिती स्थापन करण्यात आली असून ती समिती हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आहे का? याचा अभ्यास करतील, असेही आंध्र प्रदेशचे आरोग्य सचिव कुमार यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि