Iran Missile Attack on UAE Oil Tanker : होर्मुझमध्ये तणावाचा स्फोट! UAEच्या दोन तेलवाहू जहाजांवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; भारतीय खलाशी ठार, ८ जण जखमी

होर्मुझच्या सामुद्रधुनीत पुन्हा एकदा तणाव शिगेला पोहोचला आहे. इराणने संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) दोन तेलवाहू जहाजांवर क्षेपणास्त्र हल्ला केल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री उशिरा घडली. या हल्ल्यात एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला, तर सहा भारतीय आणि दोन युक्रेनियन नागरिकांसह ८ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. (Iran Missile Attack on UAE Oil Tanker)


संयुक्त अरब अमिरातीच्या संरक्षण मंत्रालयाने या हल्ल्याला दुजोरा दिला असून, 'मोम्बासा' आणि 'बाहिया' या UAEच्या ध्वजाखालील दोन तेलवाहू जहाजांना लक्ष्य करण्यात आल्याचे सांगितले आहे. 'मोम्बासा' जहाजावरील भारतीय खलाशी हल्ल्यात मृत्युमुखी पडल्याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे. (Iran Missile Attack on UAE Oil Tanker)



ट्रम्प यांच्या घोषणेनंतर हल्ला :


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला "होर्मुझ सामुद्रधुनीचा संरक्षक" घोषित करत या मार्गावरील जहाजांच्या सुरक्षेसाठी २० टक्के सुरक्षा शुल्क आकारण्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर काही तासांतच इराणकडून हा हल्ला झाल्याने पश्चिम आशियातील तणाव आणखी वाढला आहे. (Iran Missile Attack on UAE Oil Tanker)



UAEचा तीव्र निषेध :


संयुक्त अरब अमिरातीने या हल्ल्याचा तीव्र निषेध करत याला आंतरराष्ट्रीय कायद्याचे गंभीर उल्लंघन म्हटले आहे. देशाच्या सुरक्षा आणि राष्ट्रीय हिताचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्याचा अधिकार आपण राखून ठेवत असल्याचे UAEने स्पष्ट केले आहे. UAEच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात मृत भारतीय खलाशाच्या कुटुंबीयांप्रती तसेच भारत सरकार आणि भारतीय जनतेप्रती शोकसंवेदना व्यक्त करण्यात आल्या आहेत. तसेच जखमींना लवकर बरे वाटावे, अशी प्रार्थनाही करण्यात आली आहे. (Iran Missile Attack on UAE Oil Tanker)



अमेरिका-इराण संघर्ष अधिक तीव्र :


अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाला आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने होर्मुझ सामुद्रधुनीतील हालचालींवर निर्बंध आणल्यानंतर अमेरिकेने इराणविरोधातील कारवाया तीव्र केल्या आहेत. तसेच इराणी बंदरांकडे जाणाऱ्या आणि तेथून येणाऱ्या सागरी वाहतुकीवर पुन्हा नाकेबंदी लागू करण्याची घोषणाही अमेरिकेने केली आहे. (Iran Missile Attack on UAE Oil Tanker)


दरम्यान, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे की, ही नौदल नाकेबंदी केवळ इराण आणि इराणसोबत व्यापार करणाऱ्या जहाजांसाठी असेल, तर इतर देशांच्या जहाजांना होर्मुझ सामुद्रधुनीतून मार्ग दिला जाईल. मात्र त्यासाठी २० टक्के सुरक्षा शुल्क आकारले जाईल, अशी भूमिका त्यांनी पुन्हा एकदा मांडली आहे.

Comments
Add Comment

Russia Ukraine War : रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात एका भारतीयासह १२ जणांचा मृत्यू

कीव्ह : रशियाने युक्रेनवर रात्रभर केलेल्या भीषण हवाई हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा आणि इतर ११ जणांचा अशा एकूण १२

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ऐतिहासिक बिश्केक जाहीरनाम्यावर स्वाक्षरी

बिश्केक : २६ व्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेत मंगळवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

USS Abraham Lincoln : थायलंडमध्ये पोलिसांची मोठी कारवाई! ५ हजार अमेरिकन सैनिकांच्या आगमनापूर्वी पटायातील देहव्यापारावर धाडी

पटाया : थायलंडचे प्रसिद्ध पर्यटन शहर असलेल्या पटाया (Pattaya) मध्ये सध्या पोलिसांकडून देहविक्री करणाऱ्या महिला आणि

PM Modi SCO Summit 2026 : दहशतवादावर पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला थेट संदेश; ‘दहशतवादाबाबत दुहेरी मापदंड नको’

बिश्केक : शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (SCO) २६व्या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी

Nepal Flood Rescue : नेपाळ-तिबेट पुरानंतर महाराष्ट्रातील ६७ नागरिकांशी संपर्क नाही; शोधासाठी केंद्राचे विशेष पथक काठमांडूत दाखल

नेपाळ-तिबेट परिसरात २६ ऑगस्ट रोजी आलेल्या विनाशकारी पुरानंतर महाराष्ट्रातील ६७ नागरिकांशी अद्याप संपर्क होऊ

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही