Krishna controversy : 'श्रीकृष्ण मुस्लिम होता', मौलानाचा दावा; व्हायरल व्हिडिओवरून नवा वाद, हिंदू संघटनांकडून कारवाईची मागणी

श्रीकृष्णावरून वाद; हिंदू संघटना संतापली


मथुरा : श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण न्यायालयात प्रलंबित असतानाच एका जुन्या व्हिडिओमुळे (Video) नवा वाद निर्माण झाला आहे. मौलाना जर्जिस अन्सारी यांनी भाषणादरम्यान भगवान श्रीकृष्णांविषयी वादग्रस्त दावा केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल (Viral) झाला आहे. या व्हिडिओनंतर हिंदू संघटनांनी तीव्र आक्षेप घेत संबंधित मौलानावर कारवाईची मागणी केली आहे. ( Krishna controversy)



व्हिडिओत नेमकं आहे तरी काय?  Viral maulana Video


व्हायरल व्हिडिओमध्ये मौलाना (Maulana Jargis Ansari) अन्सारी यांनी, "भगवान श्रीकृष्ण धर्माने मुस्लिम होता आणि ते दिवसातून पाच वेळा नमाज अदा करत होते," असा दावा केल्याचे दिसत आहे. आपल्या दाव्याच्या समर्थनासाठी त्यांनी श्रीमद्भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायातील दहाव्या श्लोकाचा उल्लेख केला. ( Mathura controversy)




सहाव्या अध्यायातील दहाव्या श्लोकाचा नेमका अर्थ काय ?


"एका योग्याचे कर्तव्य आहे की, त्याने आपले मन, शरीर आणि आत्मा निरंतर परमेश्वराच्या चरणी लीन करावे. एकांतात राहून, आपल्या मन आणि इंद्रियांवर ताबा मिळवून, सर्व प्रकारच्या भौतिक इच्छा आणि मोहापासून मुक्त व्हावे." दिलेल्या श्लोकात कुठेही 'नमाज' किंवा 'इस्लाम' या शब्दांचा संबंध नाही. केवळ ध्यान आणि योगाद्वारे ईश्वरप्राप्तीचे मार्गदर्शन यात केले आहे. (Hindu Organization)



हिंदू संघटनांकडून संताप


हा व्हिडिओ पुन्हा व्हायरल (Viral) झाल्यानंतर मथुरासह विविध ठिकाणी हिंदू संघटनांनी संताप व्यक्त केला आहे. धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत संबंधित मौलानाविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. धार्मिक ग्रंथांचा चुकीचा अर्थ लावून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. (Uttar Pradesh News)


दरम्यान, मौलाना जर्जिस अन्सारी यांच्यावर यापूर्वीही वादग्रस्त विधानांमुळे टीका झाली होती. २०२२ मध्ये महिलांबाबत केलेल्या एका वक्तव्यावरूनही त्यांच्यावर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.


सध्या व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर वातावरण संवेदनशील असल्याने संबंधित प्रकरणाकडे प्रशासनाचे लक्ष लागले असून, पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष आहे.

Comments
Add Comment

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

IST Mandatory 2027 : मार्च २०२७ पासून देशभरात इंडियन स्टँडर्ड टाइम बंधनकारक

नवी दिल्ली : देशातील सर्व संस्था, कंपन्या आणि संबंधित आस्थापनांना मार्च २०२७पासून कायदेशीर, व्यावसायिक, डिजिटल

Manjit Kaur : लिव्ह-इन पार्टनरच्या अत्याचारानंतर ५४ दिवस मृत्यूशी झुंज; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौरचा मृत्यू

मनजीत कौरचा लिव्ह-इन पार्टनर आणि त्याच्या एका साथीदाराच्या क्रूरतेनंतर ५४ दिवस रुग्णालयात जिद्दीने जगण्यासाठी